शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: बुधवार, 7 फेब्रुवारी 2024 (11:19 IST)

सुरु होतोय ‘लव्ह वीक’? पाहा पूर्ण लिस्ट

love
कपलच नव्हे तर हल्ली मित्रमैत्रिणी, कुटुंबातील सदस्य देखील केवळ आनंद, मौज म्हणून व्हेलेंटाईन डे साजरा करतात. आयुष्यात अशी एक खास व्यक्ती असेल ज्यावर आपण प्रेम करू शकता आणि जी तुमच्यावर मनापासून प्रेम करते आहे, तर त्या व्यक्तीसमोर आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यास अजिबात संकोच बाळगू नका.
 
व्हॅलेंटाईन डे वीक
रोज डे, ७ फेब्रुवारी २०२४ (बुधवार)
फेब्रुवारी महिन्याची ७ तारीख म्हणजे वॅलेंटाईन विकची सुरूवात. हा दिवस सुरू होतो तो गुलाबाच्या सुखद सुगंधाने. Rose Day असं या पहिल्या दिवसाला म्हणतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबासारखे दुसरे फूल नाही असं म्हटलं जातं आणि म्हणूनच पहिल्या दिवशी आपण ज्या व्यक्तीवर जीव लावतोय अशा व्यक्तीला गुलाब देऊन आठवड्याची सुरूवात केली जाते.
 
प्रपोज डे, ८ फेब्रुवारी २०२४ (गुरुवार)
सरा दिवस म्हणजे ८ फेब्रुवारी रोजी Propose Day साजरा केला जातो. तुम्हाला जे मनापासून आवडतात त्या व्यक्तीला आपल्या मनातील प्रेम व्यक्त करून आयुष्यभराची साथ देण्यासाठी मागणी घालण्याचा हा दिवस आहे.
 
चॉकलेट डे, ९ फेब्रुवारी २०२४ (शुक्रवार)
व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस Chocolate day म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी युगल एकमेकांना चॉकलेट बुफे, चॉकलेट बास्केट भेट म्हणून देतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी चॉकलेटशिवाय दुसरा योग्य पदार्थ नक्की काय असू शकतो?
 
टेडी डे, १० फेब्रुवारी २०२४ (शनिवार)
टेडी डे हा व्हॅलेंटाईन वीकचा चौथा दिवस आहे. यावेळी लोक आपल्या जोडीदाराला टेडी बेअर देऊन प्रेम व्यक्त करतात. वास्तविक मुलींना असे सॉफ्ट टॉईज अधिक आवडतात आणि म्हणूनच त्यांना खुष करण्यासाठी हे देण्यात येते.
 
प्रॉमिस डे, ११ फेब्रुवारी २०२४, (रविवार)
प्रेम करणे जितके सोपे आहे तितकेच ते निभावणे कठीण. त्यामुळे प्रपोज केल्यानंतर आयुष्यभर हे नातं जपण्यासाठी वचन देण्याचा दिवस म्हणजे Promise Day. या दिवशी प्रेमी युगल एकमेकांना एकत्र राहण्याचे वचन देतात.
 
हग डे, १२ फेब्रुवारी २०२४ (सोमवार)
व्हॅलेंटाईन वीकच्या सहावा दिवस म्हणजेच Hug Day प्रेमी युगल एकमेकांना मिठी मारून प्रेम आणि आपुलकी व्यक्त करतात. समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी असलेल्या भावना अधिक चांगल्या कळतात.
 
किस डे, १३ फेब्रुवारी २०२४ (मंगळवार)
व्हॅलेंटाईन वीकचा सातवा दिवस Kiss Day म्हणून साजरा केला जाणार आहे, जो यंदा १३ फेब्रुवारीला आहे. Kiss Day च्या दिवशी आपल्या जोडीदाराला चुंबन देत आपले प्रेम व्यक्त करावे. कधी कधी शब्दात ती जादू नसते जी आपल्या आवडत्या व्यक्तीला जवळ घेऊन किस करायचे असते.
 
व्हॅलेंटाईन डे, १४ फेब्रुवारी २०२४ (बुधवार)
Valentine Day हा व्हॅलेंटाईन वीकचा शेवटचा दिवस आहे . प्रेम वर्षभर साजरे करावे हे जरी खरे असले तरीही हा स्पेशल दिवसही साजरा करायलाच हवा. धावपळीच्या आयुष्यात कधी कधी वेळ मिळत नाही. मग अशावेळी आपले प्रेम व्यक्त करणे कधीच चुकीचे ठरत नाही.
 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor