1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
  4. Propose Day 2026 Wishes in Marathi

Propose Day 2026 Wishes in Marathi प्रपोज डे शुभेच्छा मराठीत

प्रपोज डे २०२६ च्या शुभेच्छा मराठीत
तुझ्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण 
माझ्यासाठी खास आहेत
मला आयुष्यभर तुझाच हात 
हातात हवा आहे
काय तू माझी सोबती होशील?
 
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर 
मला तुझी साथ हवी आहे
सुख असो वा दुःख, 
मला नेहमी तुझ्यासोबत राहायचे आहे
हॅप्पी प्रपोज डे!
 
मला माहीत नाही प्रेम काय असतं, 
पण जेव्हा तू जवळ असतेस तेव्हा 
जगातील सगळ्यात आनंदी व्यक्ती मी असतो
माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे!
 
तुझ्या हसण्याने माझं आयुष्य उजळून निघतं
हे हास्य मला रोज पाहायचं आहे
माझ्या आयुष्याचा भाग होशील का?
 
आजच्या दिवशी मला एकच कबुली द्यायची आहे... 
माझं हे हृदय फक्त तुझ्यासाठीच धडधडतं
प्रपोज डे च्या शुभेच्छा!
 
शब्दांत सांगता येणार नाही इतकं प्रेम तुझ्यावर आहे, 
पण कृतीने ते आयुष्यभर सिद्ध करायची माझी तयारी आहे
माझ्या आयुष्यात येशील का?
 
कधी मैत्री, कधी भांडण, तर कधी अबोला... 
पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र कायम आहे, 
ती म्हणजे तुझं माझ्यावर असणारं प्रेम
काय आपण हे नातं आयुष्यभरासाठी टिकवायचं?
 
आयुष्याच्या पुस्तकात मला तुझा आणि माझा एक सुंदर अध्याय लिहायचा आहे
तू माझी साथ देशील का?
 
मला तुझं वर्तमान बनायचं नाहीये, 
तर तुझं भविष्य बनायचं आहे
आयुष्यभरासाठी माझा हात थामशील का?
 
तू माझ्यासाठी केवळ एक व्यक्ती नाहीस, 
तर माझं संपूर्ण जग आहेस
आय लव्ह यू!
 
आज प्रपोज डे आहे आणि मला तुला सांगायचंय की, 
तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे
काय तू ते पूर्ण करशील?
 
ना कोणाचं रूप हवंय, ना कोणाची श्रीमंती... 
मला फक्त तुझी साथ आणि तुझं प्रेम हवंय
हॅप्पी प्रपोज डे!
 
मला तुला कधीच गमवायचं नाहीये
तू कायम माझ्या जवळ असावी हीच माझी इच्छा आहे
प्रपोज डे च्या खूप खूप शुभेच्छा!
 
तुझ्याशी तासनतास बोलणं आणि तुझा चेहरा पाहत राहणं
हेच माझं सुख आहे
माझ्या आयुष्यात कायम राहशील का?
 
माझ्या स्वप्नांची राणी तूच आहेस आणि 
मला ही स्वप्नं सत्यात उतरवायची आहेत
तुझं उत्तर काय आहे?
पुढील लेख
डिप्लोमा पॉवर इंजिनीअरिंग मध्ये करिअर बनवा