संबंधित माहिती
- Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
- Propose Day 2026: तुमचे प्रेम व्यक्त करण्याचे सोपे मार्ग, या चुका करू नका
- Propose Day 2026 Wishes in Marathi प्रपोज डे शुभेच्छा मराठीत
- १३ फेब्रुवारी किस डे: किस करण्यापूर्वी जाणून घ्या या ७ टिप्स
- Hug Day 2025 Wishes In Marathi: हग डेच्या शुभेच्छा
'Propose Day' special रेड वेलव्हेट हार्ट पेस्ट्री बनवून जोडीदाराला द्या सरप्राईज
साहित्य-
मैदा-१.५ कप
मैदा-१.५ कप
पिठी साखर-१ कप
कोको पावडर-१ मोठा चमचा
दूध-१ कप
तेल किंवा वितळलेले बटर-१/२ कप
व्हिनेगर किंवा लिंबाचा रस- १ मोठा चमचा
बेकिंग पावडर- १ चमचा
बेकिंग सोडा-१/२ चमचा
लाल फूड कलर-१/२ चमचा
व्हॅनिला इसेन्स- १ चमचा
व्हिप्ड क्रीम-१.५ कप
क्रीम चीझ - २ चमचे
कृती-
सर्वात आधी एका बाऊलमध्ये दूध आणि व्हिनेगर एकत्र करून ५ मिनिटे बाजूला ठेवा आता त्यात तेल, साखर आणि व्हॅनिला इसेन्स घालून नीट मिक्स करा. त्यात लाल फूड कलर घाला आणि मिसळा. एका चाळणीने मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर आणि सोडा चाळून घ्या आणि ओल्या मिश्रणात हळूहळू मिक्स करा.आता केकचे भांडे तूप लावून ग्रीस करा. त्यात बॅटर ओता. ओव्हनमध्ये: १८०°C वर २५-३० मिनिटे बेक करा. किंवा कढई १० मिनिटे गरम करा, त्यात स्टँड ठेवा आणि भांड्यावर झाकण ठेवून ३५-४० मिनिटे मंद आचेवर बेक करा.
केक पूर्णपणे थंड झाल्यावर त्याचे दोन किंवा तीन थर कापून घ्या. जर तुमच्याकडे हार्ट शेप कटर असेल तर त्याने कापून घ्या, किंवा कागदावर हृदय कापून ते केकवर ठेवून सुरीने आकार द्या. आता क्रीम घट्ट होईपर्यंत फेटून घ्या. केकच्या पहिल्या थरावर थोडे शुगर सिरप लावा, मग क्रीमचा थर द्या. असे सर्व थर रचून झाल्यावर संपूर्ण पेस्ट्रीला क्रीमने कव्हर करा.केक कापताना उरलेला जो लाल चुरा असतो, तो पेस्ट्रीच्या कडेने लावा. यामुळे पेस्ट्रीला सुंदर 'वेलव्हेट' लूक येतो.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
