शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: शनिवार, 29 जानेवारी 2022 (17:30 IST)

Valentine week days list जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीक लिस्ट, असे व्यक्त करा तुमचे प्रेम

व्हॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. अनेक प्रेमळ जोडपे व्हॅलेंटाईन वीकची आतुरतेने वाट पाहत असतात जेणेकरून ते पुन्हा एकदा आपल्या जोडीदारावर पूर्ण उत्साहाने प्रेम व्यक्त करू शकतील. यासोबत जे लोक कोणावर तरी प्रेम करतात पण आपल्या भावना आपल्या जोडीदारासमोर व्यक्त करू शकलेले नाहीत, त्यांच्यासाठी हा संपूर्ण आठवडा खूप खास आहे. व्हॅलेंटाईन वीक 7 दिवस म्हणजे 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत चालतो. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जोडपे एकमेकांना गुलाब, चॉकलेट, भेटवस्तू आणि इतर अनेक गोष्टी देऊन प्रेम व्यक्त करतात. व्हॅलेंटाईन वीक हा रसिकांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. या संपूर्ण आठवड्यात लोक वेगवेगळ्या प्रकारे आपल्या जोडीदारावर प्रेम व्यक्त करतात. व्हॅलेंटाईन वीक सुरू होण्यापूर्वी तुम्हाला संपूर्ण यादी माहित असणे महत्त्वाचे आहे जेणेकरून तुम्ही आतापासून संपूर्ण तयारी करू शकता.
 
 
Valentine Week List
7 फेब्रुवारी - रोज डे
8 फेब्रुवारी - प्रपोज डे
9 फेब्रुवारी - चॉकलेट डे
10 फेब्रुवारी - टेडी डे
11 फेब्रुवारी - प्रॉमिस डे
12 फेब्रुवारी - हग डे
13 फेब्रुवारी - किस डे
14 फेब्रुवारी - व्हॅलेंटाईन डे
 
7 फेब्रुवारी - रोज डे
रोज डे या दिवशी लोक आपल्या जोडीदाराला गुलाब देऊन त्यांच्या भावना व्यक्त करतात. लाल गुलाब हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांनी भावनांचे अर्थही बदलतात. जर तुम्हाला या व्हॅलेंटाईन वीकमध्ये एखाद्यावर प्रेम व्यक्त करायचे असेल, तर तुमच्या जोडीदाराला भेट म्हणून फक्त लाल गुलाब द्या. यानंतर तुमचे मन व्यक्त करण्यासाठी तुम्हाला शब्दांची गरज भासणार नाही.
 
8 फेब्रुवारी - प्रपोज डे
जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला गुलाबाच्या फुलांद्वारे तुमचे मन समजावून सांगू शकला नसाल तर त्याच्याशी थेट बोलणे चांगले. एखाद्या रोमँटिक ठिकाणी किंवा खुल्या गच्चीवर किंवा मॉलच्या मधोमध जिथे तुमला वाटत असेल तेथे गुडघ्यावर बसा आणि तुमचं मन सांगताना जोडीदाराला प्रपोज करा.
 
9 फेब्रुवारी - चॉकलेट डे
चांगली सुरुवात करण्यासाठी काहीतरी गोड आवश्यक आहे. यासाठी चॉकलेट डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला चॉकलेट गिफ्ट करू शकता. या दिवसासाठी चॉकलेट्स वेगवेगळ्या आणि अतिशय सुंदर पॅकिंगमध्ये येतात. तुमच्या जोडीदाराला चॉकलेट्स गिफ्ट करून तुम्ही त्यांना दाखवू शकता की त्यांचे प्रेम तुमच्यासाठी किती खास आहे.
 
10 फेब्रुवारी - टेडी डे
भेटवस्तू प्रेम वाढवतात यात शंका नाही. म्हणून टेडी डे या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला एक गोंडस लहान टेडी बियर भेट देऊ शकता. मार्केटमध्ये तुम्ही तुमच्या बजेटमध्ये म्हणजे 100 रुपयांपासून 2 हजारांपर्यंत टेडी बेअर खरेदी करू शकता.
 
11 फेब्रुवारी - प्रॉमिस डे
प्रेमसंबंधात वचनबद्धता खूप महत्त्वाची असते. दोन ह्रदयांना जोडणारा हा धागा आहे. वेगवेगळ्या शहरात राहूनही लोकांना आपल्या जोडीदाराशी जोडलेले वाटते. अशा परिस्थितीत 11 फेब्रुवारीला प्रॉमिस डे या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला वचन देऊ शकता की त्यांचे प्रेम तुमच्यासाठी नेहमीच खास असेल.
 
12 फेब्रुवारी - हग डे
प्रेमात स्पर्शाची भावना नाकारता येत नाही. प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही या दिवशी तुमच्या जोडीदाराला मिठी मारू शकता. त्या बदल्यात तुमचा जोडीदारही तुम्हाला प्रेमाने भरलेली जादूची मिठी देत ​​असेल तर समजून घ्या की त्याच्याही हृदयात तुमच्यासाठी अपार प्रेम आहे.
 
13 फेब्रुवारी - किस डे
प्रेमावर किती लिहिलं-वाचलंय कळत नाही. प्रेमातल्या पहिल्या चुंबनाबद्दलही अनेक कवींनी बरंच काही लिहिलं आहे. या दिवशी तुम्ही जोडीदाराच्या कपाळाचे चुंबन घेऊन, त्याच्या हातांचे चुंबन घेऊन किंवा त्याच्या ओठांचे चुंबन घेऊन तुमचे प्रेम व्यक्त करू शकता. पण त्याआधी हे नक्की जाणून घ्या की तुमचा पार्टनर यासाठी किती कम्फर्टेबल आहे. किस डे या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला किस करून तुमचे प्रेम व्यक्त करू शकता.
 
14 फेब्रुवारी - व्हॅलेंटाईन डे
एवढ्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेरचा व्हॅलेंटाईन डे येतो. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एकांतात शांततापूर्ण क्षण घालवू शकता. जिथे तुम्ही शांत असलो तरी एकमेकांचे मौन अनुभवता येते. हे दिवसभर तुमच्या जोडीदाराच्या नावाने करण्याचा प्रयत्न करा.