भिंत पुन्हा चालली...
- मनमोहन नातू
अंदमानात असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांना काव्य स्फुरू लागले. जवळ कागद नव्हते. त्यांनी उष:कालच्या आभाळाला विचारले, 'माझा कागद होतोस काय?' आभाळ उत्तरले -मी मुक्तामधले मुक्त - तू कैद्यांमधला कैदी।माझे नि तुझे व्हायाचे - ते सूर कसे संवादी?माझ्यावर लिहिती गीते - या मंद-समीरण लहरी।माझ्यावर चित्रित होते - गरूडाची गर्द भरारी।।जड लंगर तुझिया पायी - तू पीस कसा होणार?माझ्याहून आहे योग्य - भूमीला प्रश्न विचार।।आभाळ म्हणाले 'नाही' - भूमिही म्हणाली 'नाही'।मग विनायकाने त्यांची - आळवणी केली नाही।।पापण्यांत जळली लंका - लाह्यांपरि आसू झाले।उच्चारून होण्याआधी - उच्चाटन शब्दां आले।की जन्म घ्यायच्या वेळी - गंगेस हिमालय नाही।शाई न स्पर्शली असूनी - हे अभंग नदिच्या 'बाही'।।(
ती पहाट लालम् लाल - अनपेक्षित झाली काळी)दगडाची पार्थिव भिंत - तो पुढे अकल्पित सरली।'
मी कागद झाले आहे - चल लिही' असे ती वदली।