शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जून 2020 (06:12 IST)

श्री विठ्ठलाला तुळसी आणि मंजिरीचा हार वाहण्‍यामागचे वैशिष्‍ट्ये

तुळशीमध्‍ये श्रीविष्‍णूची स्‍पंदने आकर्षित करण्‍याची शक्‍ती आधिक असते. श्री विठ्‍ठल हे श्रीविष्‍णूचे रुप आहे. विठ्‍ठलाच्‍या मूर्तीला तुळस वाहिल्‍याने ती जागृत व्‍हायला मदत होते. त्‍यामुळे मूर्तीतील चैतन्‍याचा लाभ उपासाकाला होतो. मंजिरी आपल्‍या स्‍पर्शातून विष्‍णतत्‍त्‍वाला जागृत करणारी आहे.
 
तुळशीची मंजिरी
तुळशीत श्रीकृष्‍णतत्‍त्‍व असल्‍याने तिच्‍या मंजिरीतून उधळल्‍या जाणार्‍या चैतन्‍यामुळे विठ्‍ठलाच्‍या मूर्तीतील चैतन्‍य जागृत होते आणि  त्‍याचे रुपांतर विष्‍णूतत्‍त्‍वात होते, त्‍यातून भक्‍ताला निर्गुणस्‍वरुप चैतन्‍याची अनुभूती येते. 
 
श्री विठ्‍ठलाच्‍या छातीवर रुळणारा तुळीशीच्‍या मंजिरीचा हार हा मूर्तीच्‍या मध्‍यभागातील स्‍थितीविषयक श्रीविष्‍णूरुपी क्रिया शक्‍तीला चालना देणारा असल्‍याने भाविकांच्‍या सर्व प्रकाराच्‍या मनोकामना पूर्ण होतात. 
 
श्री विठ्ठलाला तुळस वाहण्याची वेगळी वैशिष्ट्ये
तुळस श्रीलक्ष्मीचे प्रतीक आहे व श्रीलक्ष्मी ही श्रीविष्णूची पत्नी असल्यामुळे (श्री विठ्ठल हा श्रीविष्णूचे रूप आहे.) ती तुळशीच्या माध्यमातून श्रीहरी चरणी राहते.