vitthal dandi, aashadhi ekadashi pandharpur | विठ्ठलाची आरती
|
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहे... ॥ धृ ॥
आलिया गेलिया हाती धाडी निरोप ।
पंढरपूरी आहे माझा मायबाप... ॥ १ ॥
पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ।
गरुडांवर बैसोनि माझा कैवारी आला... ॥ २ ॥
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा जीवेभावे ओंवाळी... ॥ ३ ॥
