Mangalgaur Ukhane Images मंगळागौरीचे उखाणे इमेजेस
हातात घातल्या बांगड्या, गळ्यात घातली ठुशी,
… रावांचे नाव घेते मंगळागौरच्या दिवशी!
पैठणी घालण्यासाठी मी आहे फार हौशी,
…रावांचे नाव घेते मंगळागौरच्या दिवशी!
मंगळागौरी माते, नमन करते तुला
… रावांचे नाव घेते, अखंड सौभाग्य लाभो मला
मंगळागौरीला पुजल्या आहेत सौळा पत्री
… रावांची मी आहे कुशल गृहमंत्री
मेघमल्हार बहरताच,
श्रावणसर कोसळते,
…रावांचे नाव घेऊन मंगळागौरीची पूजा करते

