1. लाईफस्टाईल
  2. शुभेच्छा व अभिवादन
  3. शुभेच्छा संदेश
  4. Narak Chaturdashi Wishes Abhyanga Snan 2026

Abhyanga Snan 2026 Wishes in Marathi नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नान शुभेच्छा

उटण्याचा सुगंध आणि घमघमाट, 
अभ्यंगस्नानाने होवो तुमच्या आयुष्याची नवी पहाट! 
नरक चतुर्दशी व अभ्यंगस्नानाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
पहाटेचा प्रकाश, अभ्यंगस्नानाचा आनंद आणि उटण्याचा घमघमाट! 
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नरक चतुर्दशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
कारिट फोडून दृष्ट प्रवृत्तीचा विनाश होवो 
आणि अभ्यंगस्नानाने तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धीचा प्रकाश येवो
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
अभ्यंगस्नानाच्या या पवित्र दिवशी 
तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर होवो 
आणि सुख-शांतीचा लाभ होवो
शुभ नरक चतुर्दशी!
 
पहिला दिवा लावून करूया दिवसाची सुरुवात, 
अभ्यंगस्नानाने उजळो तुमचे आयुष्य खास! 
नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा!
 
उटणे, तेलाचा सुवास आणि दिव्यांची आरास... 
आजचा हा अभ्यंगस्नानाचा दिवस घेऊन येवो 
तुमच्या आयुष्यात नवा उत्साह खास
नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा!
 
नरकासुराचा संहार करून सत्याचा विजय झाला, 
चला अभ्यंगस्नान करून या पवित्र दिवसाचा आनंद साजरा करूया
नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा!
 
पहाटेचे ते अभ्यंगस्नान आणि फटाक्यांची घाई, 
तुमच्या आयुष्यात येवो समृद्धीची नवाई
नरक चतुर्दशी व अभ्यंगस्नानाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
अभ्यंगस्नानाच्या मंगलमय क्षणी 
तुमच्या जीवनातील सर्व दुःखांचा अंत होवो 
आणि यशाची नवी पहाट उगवो
दीपावली व नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा!
 
दिवाळीचा हा दिवस तुमच्या जीवनात 
निरामय आरोग्य आणि उदंड आयुष्य घेऊन येवो
अभ्यंगस्नानाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
सुगंधी उटणे आणि तेलाच्या स्पर्शाने उजळू दे शरीर आणि मन, 
नरक चतुर्दशीचा हा सण जावो अतिशय पावन
नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा!
 
सत्याचा असत्यावर विजय आणि प्रकाशाचा अंधारावर विजय... 
अभ्यंगस्नानाच्या या मंगलमय दिवशी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!
पुढील लेख
बिना पाकाचे आणि झटपट होणारे रव्याचे लाडू; नवशिक्यांसाठी सर्वात सोपी रेसिपी