Marathi Celebrity Deaths in 2022 या वर्षी मराठी कलाकरांनी जगाचा निरोप घेतला
गेल्या एका वर्षात मराठी सिनेसृष्टी आणि टीव्ही जगताशी संबंधित अनेक कलाकारांचा मृत्यू झाला आहे. यावर्षी अनेक स्टार कायमचे दुरावले.
विक्रम गोखले
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे 26 नोव्हेंबर रोजी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. विक्रम यांनी रंगभूमी, टीव्ही आणि सिनेमा ही तीनही माध्यमं गाजवले आहेत. ते मराठी रंगभूमी, हिंदी चित्रपट आणि दूरदर्शनमधील त्यांच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध होते.
कल्याणी कुरळे जाधव
'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव हिचा कोल्हापुरात अपघाती मृत्यू झाला. कल्याणीने कोल्हापूर-सांगली महामार्गावर एक हॉटेल सुरू केलं होतं. 12 नोव्हेंबर रोजी रात्री हे हॉटेल बंद करून बाहेर पडत असताना कल्याणीला एका ट्रॅक्टरने धडक दिली.
ज्ञानेश माने
'लागिरं झालं जी' मालिकेतील अभिनेते डॉ. ज्ञानेश माने यांचे 14 जानेवारी रोजी अपघाती निधन झाले. पुण्याजवळील रोटी घाटातून जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. त्यात ज्ञानेश बेहोश झाल्यावर त्याला पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल केले परंतु तोपर्यंत ज्ञानेशची प्राणज्योत मावळली होती.
ईश्वरी देशपांडे
मराठी अभिनेत्री ईश्वरी देशपांडे हिचा 20 सप्टेंबर रोजी अपघाती मृत्यू झाला. गोव्यातील बागा- कलंगुट येथे घडलेल्या या अपघातात ईश्वरीचा मित्र शुभम देगडे याचंही निधन झालं. शुभमचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी खाडीत कोसळली. गाडी लॉक झाल्याने दोघांच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
रमेश देव
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराने निधन झाले. निधनाच्या मात्र 4 दिवसांपूर्वी त्यांचा 93 वा वाढदिवस साजरा केला गेला होता. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रदीप पटवर्धन
मराठी रंगभूमीवरचे कलाकार आणि विनोदी अभिनेता प्रदीप पटवर्धन यांचा 9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ते 64 वर्षांचे होते. मोरुची मावशी हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले होते आणि या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती.