शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022 (15:41 IST)

अभिनेत्री सखी गोखले यांनी विक्रम गोखले यांच्याबाबत एक पोस्ट शेअर केली

अभिनेत्री सखी गोखले यांनी विक्रम गोखले यांच्याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. विकिपीडियावर विक्रम गोखले हे सखीचे काका आहेत असं दाखवलं जात आहे. तसेच विक्रम गोखले यांच्याबाबत एकही पोस्ट शेअर न केल्यामुळे तिला ट्रोलही करण्यात आलं. याबाबत आता तिने एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
सखी म्हणाली, “अभिनेते विक्रम गोखले हे एक उत्कृष्ट अभिनेता होते. त्यांचा (विक्रम गोखले) माझ्याशी काही संबंध आहे की नाही, मी त्यांच्याबाबत काही पोस्ट करायचं की नाही हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. विक्रम काका गेल्यानंतर त्यांच्याबाबत मी काहीच पोस्ट शेअर केली नाही. याबाबतचे असंख्य मॅसेज मला आले आहेत.

शिवायकाहींनी माझ्यावर राग व्यक्त केला आहे. माझ राग करण्याआधी यामागे खरं कारण काय आहे हे शोधा. माझ्याशी विनम्र वागण्यात तुम्ही जेवढा वेळ घालवलात त्या वेळेचा तुम्ही ज्ञान मिळवण्यासाठी वापर करा. जेणेकरून तुमच्या कुटुंबियांना व मित्रांना तुमची लाज वाटणार नाही.” सईने सत्य सांगत ट्रोल करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor