रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 26 जून 2021 (20:48 IST)

सूर्य नमस्कार करताना या चुका करू नका,फायदा मिळणार नाही

सूर्य नमस्कार हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे.सूर्य नमस्कार केल्याचे अनेक फायदे आहे.परंतु ते सर्व फायदे मिळविण्यासाठी हे आवश्यक आहे की आपण योग्य पद्धतीने सूर्य नमस्कार करावे.कारण सूर्य नमस्कार करण्याचे 12 क्रम आहे.योग्य पद्धतीने सूर्य नमस्कार केल्याने वजन सहजरित्या कमी केले जाऊ शकते.परंतु जर आपण सूर्य नमस्कार योग्य पद्धतीने केले नाही तर या पासून फायदे मिळण्या ऐवजी तोटे संभवतात.चला जाणून घेऊ या कोणत्या चुका करू नये.
 
1 चतुरंग दंडासन व्यवस्थित न करणे-बऱ्याच लोकांची सवय असते की सूर्य नमस्कार करताना ते चतुरंग दंडासना पर्यंत पोहोचल्यावर ते हे व्यवस्थित पद्धतीने करत नाही.हे आसन चुकीच्या पद्धतीने केल्यावर शरीर जमिनीवर स्पर्श होतो त्यामुळे पाठीचे दुखणे सुरु होतात म्हणून हे आसन करताना आवश्यक आहे की स्नायू उचलून ठेवा.
 
2 हस्त उत्तानासन करत नाही-हस्त उत्तानासन सूर्य नमस्कारात दोनदा येत.जर आपण हे आसन एकदाच करता किंवा करतच नाही वगळून देता.तर शरीराची गती आणि श्वासाचा वेग तुटतो.जे संपूर्ण सूर्य नमस्काराला बिघडवून टाकतो.म्हणून हे आसन पूर्ण करा.याला वगळण्याचा विचार करू नका.   
 
3 योग्यरित्या श्वासोच्छवास न करणे- कोणतेही योगासन तेव्हा फायदेशीर असतात,जेव्हा आपण ते करताना श्वासाकडे लक्ष देता.जर सूर्य नमस्कार करताना शरीराची गती आणि श्वासात मेळ नसेल तर या आसनाचा पूर्ण फायदा मिळणार नाही,म्हणून दीर्घ श्वास घेताना काळजी घ्यावी.