शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. योग
  4. »
  5. योग सल्ला
Written By वेबदुनिया|

अनुलोम-विलोम

WD
प्राणायाम करताना 1. पूरक 2. कुंभक 3. रेचक अशा तीन क्रिया केल्या जातात. यांना हठयोगात त्याला अंतर वृत्ती, स्तंभ वृत्ती व बाह्य वृत्ती म्हटले जाते.

(1) पूरक:- नियंत्रित गतीत श्वास आत घेण्याच्या क्रियेला पूरक असे म्हटले जाते.
(2) कुंभक:- आत आलेला श्वास आपल्या क्षमतानुसार रोखून ठेवण्याच्या क्रिकेला कुंभक असे म्हटले जाते.
(3) रेचक:- आत आलेला श्वास नियंत्रित गतीने सोडण्‍याच्या क्रियेला रेचक म्हटले जाते.

पूरक, कुंभक व रेचक या प्रक्रियेला योगशास्त्रात अनुलोम-विलोम असे ही म्हटले जाते. याबाबत योगाचार्यांमध्ये वेगवेगळे मत आहेत. पतंजलीनुसार 1 : 4 : 2 च्या अनुपातामध्ये याला नाडी शोधन प्राणायम म्हटले आहे.

लाभ : मनावरील तणाव कमी करून मन:शांती प्रदान होत असते. पूरक, कुंभक व रेचक या तीन ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नाडी विषयक दोष नाहीसे केले जातात. दृष्टीविकार नाहीसे होऊन रक्तसंचार सुरळीत होतो. निद्रानाशावर अत्यंत लाभदायक आहे.