गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (20:50 IST)

यूरिक अॅसिडची पातळी कमी करण्यासाठी हे योगासन करा

शरीराला निरोगी ठेवण्यासाठी शरीराचे स्वतःचे किंवा शरीरातील रसायने आणि शरीरातील पोषक घटकांचा समतोल राखणे फार महत्वाचे आहे. कोणत्याही प्रकारचे असंतुलन अनेक गंभीर आरोग्य समस्यांचा धोका वाढवतात. यूरिक अॅसिडच्या बाबतीतही असेच आहे, शरीरात त्याचे प्रमाण वाढल्याने वेदना आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. युरिक अॅसिड अँटी-ऑक्सिडंट म्हणून कार्य करते आणि आपल्या रक्तवाहिन्यांच्या होणाऱ्या नुकसानाला टाळण्यास मदत करते. रक्तात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढणे हे आरोग्यासाठी हानिकारक मानले आहे.  

यूरिक अॅसिड वाढल्याने हाडे, सांधे आणि ऊतींचे नुकसान, किडनी आणि हृदयविकार होऊ शकतात. युरिक अॅसिड ची पातळी कमी करण्यासाठी काही योगासने आहेत ज्यांचा सराव करून आपण युरिक अॅसिडची पातळी कमी करू शकतो. चला तर मग या योगासनांबद्दल जाणून घेऊ या. 
 
1 कपालभाती प्राणायाम - योग तज्ज्ञांच्या मते, कपालभाती प्राणायामाच्या नियमित सरावाने केवळ मानसिक आरोग्यालाच फायदा होत नाही, तर शरीरातील रसायनांचे संतुलन राखण्यासही ते उपयुक्त मानले जाते. कपालभाती प्राणायामाचा सराव केल्याने यूरिकअॅसिडची पातळी कमी होण्यास मदत होते. याशिवाय या प्राणायामाचा सराव केल्याने मेंदूचे आरोग्य चांगले राहते.
 
2 उष्ट्रासन -युरिक अॅसिड वाढल्यामुळे कंबर, मान, गुडघे इत्यादींमध्ये तीव्र वेदना होते. काही प्रकरणांमध्ये, यामुळे दैनंदिन कामे करण्यात अडचण येऊ शकते. या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी उष्ट्रासन योगाचा सराव करणं फायदेशीर मानला जातो. पोटाच्या खालच्या भागावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासह कंबर आणि खांदे मजबूत करण्यासाठीही हा योग अत्यंत फायदेशीर मानला जातो.
 
3 गोमुखासन- पाठीच्या आणि हातांच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी, तसेच वाढलेल्या युरिक अॅसिड वर नियंत्रण ठेवण्यासाठी गोमुखासन योगाचा सराव फायदेशीर ठरू शकतो. युरिक अॅसिड वाढल्यामुळे होणाऱ्या त्रासाला कमी करण्यासाठीही या योगाचा सराव फायदेशीर मानला जातो. त्याच्या नियमित सरावाने थकवा, तणाव आणि चिंताही कमी होते.