मान व पाठ दुखते तर हे योगासन करा
कंप्यूटर आणि लॅपटॉप यावर काम करतांना तुमच्या डोळ्यांपेक्षा जास्त भार हा खांद्यांवर पडतो.चुकीच्या पद्धतीने काम केल्यावर खांदे, मान, पाठ, आणि कंबरेवर पडणाऱ्या दबावला कमी करण्यासाठी आपण योगासनचा सराव करून दुखण्यापासून सुटका करू शकतो.चला तर मग कोणता आहे हे योगासन जाणून घेऊ या.
सेतु बंधासन-
सेतु बंधासन करण्यासाठी पाठीवर झोपून दोन्ही पायांना गूडघ्यांपासून वाकवून पायाचा फर्शीवर स्पर्श करा. आता हाताच्या मदतीने शरीराला वर उचला आणि पाठ व मांडिला फर्शीवरून वर नेतांना दीर्घ श्वास आत घ्या व बाहेर सोडा. या अवस्थेत काही वेळा पर्यंत राहा. नंतर पूर्वस्थितीत पुन्हा या.
ताडासन-
ताडासनचा सराव करतांना आपल्या दोन्ही पयांच्या टाचेमध्ये व पंजाध्ये अंतर ठेवून उभे रहा.
आता हातांना कंबरे पासून वर नेतांना तळहात व बोटांना जुळवा व मान सरळ ठेवून टाचा वर करा.
आता शरीराचा संपूर्ण भार पावलांवर टाका हे करतांना पोटाला आत करा या अवस्थेत काही वेळापर्यंत संतुलन बनवून ठेवा नंतर पूर्वस्थितीत या.
भुजंगासन-
या आसनाचा सराव करण्यासाठी पोटा वर सरळ झोपा आणि हातांना खांद्यांच्या खाली ठेवा आता बोटांना पसरवून छातीच्या वर ओढा या अवस्थेत रहा आणि श्वास घ्या. नंतर पूर्वस्थितीत परत या.