गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: शनिवार, 3 जुलै 2021 (17:12 IST)

स्तनांना निरोगी ठेवण्यासाठी स्त्रियांनी दररोज हे आसन करावे

त्रिकोणासन केल्याने शरीराची मुद्रा त्रिकोणासम दिसते.म्हणून या आसनाला त्रिकोणासन म्हणतात.हे स्त्रियांसाठी फायदेशीर आसन आहे.वाढत्या मुलींनी तर या आसनाचा सराव केला पाहिजे,या मुळे त्यांना बरेच फायदे होतात.हे आसन केल्याने बऱ्याच समस्या देखील दूर होतात.चला तर मग हे आसन करण्याची पद्धत आणि त्याच्या फायद्यांविषयी जाणून घेऊ या.
 
त्रिकोणासन करण्याची पद्धत -
सर्वप्रथम सरळ उभे राहून पायाच्या मध्ये अंतर ठेवा. हे निश्चित करा की पायाने जमीनीवर दाब द्यावा.शरीराचा संपूर्ण भार दोन्ही पायांवर समप्रमाणात असावा. हाताला खांद्यापासून सरळ पसरवून घ्या.श्वास घेत उजवा हात वर करत कानाला स्पर्श करा.आता डावा पाय बाहेर काढून दुमडून घ्या.आता श्वास सोडत कंबरेकडून डावीकडे वाका.वाकताना गुडघे दुमडू नका आणि उजवा हात कानालाच स्पर्श करून ठेवा. उजव्या हाताला जमिनीच्या समांतर आणण्याचा प्रयत्न करा आणि डाव्या हाताने घोट्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.या मुद्रेत 20 ते 30 सेकंद राहावे.
 
फायदे-
* हे आसन नियमितपणे केल्याने पाचक प्रणाली सुधारते.
 
* स्त्रियांनी हे आसन नियमितपणे केल्याने त्यांचे स्तन निरोगी राहतात.
 
* तणाव आणि नैराश्यापासून सुटका मिळविण्यासाठी देखील त्रिकोणासन प्रभावी आहे.
 
* कंबरेच्या वेदनेला दूर करण्यासाठी देखील या आसनाचा सराव केला जातो.
 
* हात,पाय आणि गुडघे बळकट करण्यासाठी देखील हे आसन केले जाते.
 
खबरदारी -जर आपल्याला मायग्रेनचा त्रास आहे तर हे आसन करू नये.अतिसार च्या समस्येमध्ये देखील हे आसन करू नये.उच्च आणि निम्न रक्तदाबाचा त्रास असल्यास एखाद्या योग प्रशिक्षकांचा सल्ल्यानुसारच हे आसन करावे.