गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मार्च 2023 (16:21 IST)

Yogasan :वाढत्या वयानुसार निरोगी राहण्यासाठी हे योगासन करा

yogasana
वाढत्या वयाबरोबर अनेक समस्या येतात. योगासनामुळे या समस्या दूर होऊ शकतात. माणसाचे वय जसजसे वाढत जाते तसतसे त्याच्या शरीरात वेगवेगळे बदल येऊ लागतात . मग तो शरीराचा अशक्तपणा असो की त्वचेवरील सुरकुत्या. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी लोक विविध उपचार पद्धती घेतात, अनेक औषधे खातात, पण तरीही काही फायदा होत नाही. 
अशावेळी या सर्व समस्यांवर फक्त योगाभ्यास हाच रामबाण उपाय आहे.निरोगी राहण्यासाठी हे योगासन केल्याने फायदा होतो. चला तर मग जाणून घ्या. 
 
उत्तानासन-
उत्तानासन करण्यासाठी सर्वप्रथम सरळ उभे राहावे. दीर्घ श्वास घेताना दोन्ही हात वरच्या दिशेला न्यावे आणि नंतर श्वास सोडताना हात खाली आणा. या दरम्यान, पायाच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच स्थितीत परत या. हे आसन केल्याने मन शांत होते आणि लिव्हरची कार्यक्षमता वाढते. यासोबतच किडनीही चांगले काम करते. स्नायू मजबूत आणि लवचिक बनतात.
 
मालासना-
या योगाने मांडीची आणि पोटाची चरबी कमी होते. असे केल्याने शरीर सक्रिय होते. सांध्यांमध्ये लवचिकता येते. मानेभोवतीचा कडकपणा निघून जातो. मलासन करण्यासाठी शौच अवस्थेत बसावे आणि नमस्कार करण्याची मुद्रा करून दोन्ही हातांच्या कोपरांना गुडघ्यापर्यंत स्पर्श करावा. या दरम्यान श्वास हळूहळू आत घ्या आणि बाहेर सोडा. काही वेळ या स्थितीत राहिल्यानंतर आरामाच्या स्थितीत उभे राहा.
 
अधोमुखश्वानासन-
अधोमुखश्वानासनाच्या सरावाने पचन सुधारते, रक्ताभिसरण वाढते, ऊर्जा मिळते. हात आणि पाय टोन करण्यासोबतच ते चिंता नियंत्रित करण्याचे काम करते. हे आसन करण्यासाठी, गुडघ्यापासून सुरुवात करून, तळवे खांद्याच्या खाली न्यावे आणि गुडघे नितंबांच्या खाली आणा. नंतर नितंब वर करून आपले गुडघे सरळ करा. अशा प्रकारे तुम्हाला उलटा V आकार बनवावा लागेल. आपले पाय एकत्र ठेवताना टाचांना जमिनीवर स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. काही सेकंदांनंतर, ते पुन्हा करा.
Edited By - Priya Dixit