1. लाईफस्टाईल
  2. »
  3. योग
  4. »
  5. योगासन
Written By वेबदुनिया|

अर्धधनुरासन

अर्धधनुरासन
या आसनात शरीराची आकृती ताणलेल्या धनुष्‍या सारखी राहत असल्याने यास अर्धधनुरासन म्हणून संबोधिले जाते. सामान्यतः यालाही 'धनुरासनच' म्हटले जाते.

पद्धती: मकरासनच्या स्थितीत पोटावर झोपा. दोन्ही पाय जवळ घेऊन हाताने वर उचला. हनुवटी जमिनीवरच ठेवा. टाच, पंजा
आणि गुडगे जोडलेले असावेत. तर कोपर कंबरेशी जोडलेले असावेत. हाताचे पंजे समांतर ठेवा.आता पाय गुडघ्यातून वाकवा. नंतर दोन्ही हातांनी पाय ओढण्याचा प्रयत्न करा. हात व पाय ताण्त असतानाच गुडगेही वर उचला. डोके शक्य तितके मागे नेण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण शरीराचे ओझे पोटावरच असावे.

तळ पाय आणि डोके समान पातळीत वर असावेत. श्वास रोखून या स्थितीत 10 ते 30 सेकंदांपर्यंत थांबा.परत खली येण्यापूर्वी हनुवटी जमिनीला टेका नंतर हात व पाय जमिनीवर आणून पुन्हा मकरासनच्या अवस्थेत या. श्वास-उच्‍व्‍छास सामान्य झाल्यानंतर पुन्हा करा. आसन किमान 3-4 वेळा करता येईल.

WD
सूचना : ज्यांना पाठीच्या मणक्यांचा किंवा स्लिप डीस्कचा जास्त त्रास असेल अशा लोकांनी हे आसन करू नये. पोटाचे काही गंभीर विकार असल्यासही हे आसन करू नका.

फायदे : धनुरासनामुळे मासपेशी आणि सांध्यांचा व्यायाम होतो. हे आसन शरीरात ऊर्जेची निर्मिती करून सत्व, रज आणि तम या गुणांचे संतुलन करते. हृदय मजबूत होते. गळ्याचे आजार चांगले होतात. तसेच पचनशक्ती वाढते. याशिवाय कब्ज दूर होऊन भूक वाढते. श्वसन क्रिया व्यवस्थित होऊन सर्वायकल, स्पोंडोलाइटिस, कंबर दुखी आणि पोटाचे आजार यावरही उपयोगी. स्त्रियांच्या मासिक पाळी संबंधीच्या अडचणीही दूर होतात.