शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मागोवा 2017
Written By

मुंबई : रेल्वे पूल घटना,निरपराध नागरिकांनी गमावले प्राण

फेरीवाला आणि इतर गोष्टीमुळे मुंबई येथील मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाली होती. या दुखद दुर्घटनेत जवळपास 22 नागरिकांनी आपले जीव गमावला आहे. तर अनेक प्रवासी नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या मध्ये एकूण 39 जण जखमी झाले. मृतांमध्ये 13 पुरुष, 8 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश  आहे.
 
शुक्रवारी (29 सप्टेंबर) सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणात पूल पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवेमुळे लोकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. यावेळी पुलावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.
 
जेव्हा प्रवासी प्रचंड गर्दी झाली तेव्हा एक माणूस काहीतरी उचलण्यासाठी खाली वाकला असता, मागच्या लोंढ्यामुळे तो ढकलला गेला व पडला. यानंतर त्याठिकाणी मागच्या लोंढ्यांमुळे चेंगराचेंगरी झाली आणि परिस्थिती खूपच बिकट झाली.
 
मुंबईतील एलफिन्स्टन -परळ स्थानकाला जोडणाऱ्या रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि केंद्राने दिले. या घटनेनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पियूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले आहे. जखमींना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
 
एल्फिन्स्टन स्टेशनच्या पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेवरुन शिवसेनेने मोदी सरकारवर टीका केली, एलफिन्स्टनवरील पुलाबाबत मी रेल्वे मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला, मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही, असा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला. 
 
या प्रकरणामुळे रेल्वे पूल प्रश्न आणि रेल्वे पूल सुरक्षा समोर आली आहेत. त्यामुळे नागरिकांनी याविरोधात भूमिका घेतली आहे.