Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'जुलै' 2021 महिन्यातील तुमचे भविष्यफल

Updated: बुधवार, 30 जून 2021 (21:26 IST)
 
कर्क ( ही, ह, हे, हो, डा, डी, डू, डे, डो)
अडलेली कामे मार्गी लागतील. समवयस्क लोकांसोबत प्रेमभाव वाढेल. नोकरीचे नवे योग जुळत आहेत. ऑफिसमध्ये कोणीतरी तुमच्याविरुद्ध कट रचत आहे, सावध राहा. मैत्री प्रेमात बदलण्याचे संकेत आहेत. विश्वास ठेवा, सर्व काही चांगले होईल. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला कुटुंबाकडून तणावाचा सामना करावा लागेल. पण जसा वेळ जाईल तशा समस्या कमी होतील. प्रेमात लाभलेल्या क्षणांमुळे विवाहित सुखावतील. तुम्ही मेहनती आहात आणि तुम्ही सगळ्या प्रकल्पासाठी भरपूर मेहनत घेतात. पण त्यामानाने फार कमी प्रतिसाद मिळतो. 
 
सिंह (मा, मी, मू, मो, टा, टी, टू, टे) 
महिन्याच्या पूर्वार्धात नवे काम सुरू करणे टाळा. व्यापारी वर्गाला असंख्य अडचणींचा सामना करावा लागेल. दीर्घ प्रवास विशेष फायदेशीर ठरणार नाही. आरोग्यही ठीक राहणार नाही. नोकरदार लोकांना आपल्या सह-कर्मचारींच्या कट-कारस्थानांचा सामना करावा लागेल. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला कुटुंबाकडून तणावाचा सामना करावा लागेल. पण जसा वेळ जाईल तशा समस्या कमी होतील. तुमच्या हट्टी स्वभावामुळे कदाचित जिवलग दुरावण्याची शक्यता आहे. पण जर तुम्ही शहाणपणाने वागलात तर तुम्हाला या महिन्यात जोडीदार मिळेल.
 
कन्या (टो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो) 
तुमच्या जीवनात मोठी उलथापालथ होणार आहे. नशीबाची गाडी थांबून थांबून पुढे सरकत आहे. कुठेतरी काहीतरी अडथळा आहे जो तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखतो आहे. मित्र तुम्हाला मदत करण्यासाठी कायम तत्पर राहतील. जोडीदाराचे हेकेखोर वागणे मानसिक तणाव वाढवेल. नोकरदार लोकांचे बॉसशी पटणार नाही. आरोग्यही साथ देणार नाही. एकुणातच हा महिना आपल्याला शुभ फ़ळ देणार नाही. नवीन जागेत राहावयास जाण्याचे बेत ठरतील. तुमच्या घरात तसे आनंदी वातावरण राहील. 
 
तूळ (रा, री, रु, रे, रो, ता, ती, तू, ते) 
जीवनात प्रगती करण्यासाठी आपल्याला सहाय्याची गरज आहे. उच्च पदावर असलेल्या एखादा व्यक्क्तीसाबतच्या तुमच्या खाजगी ओळखीचा तुम्हाला लाभ होईल. धंदयात नवे दरवाजे तर उघडतील, पण या संधीसाठी तुम्हाला सतर्क राहावे लागेल. वाहन वगैरे चालवताना जरा सावधानी बाळगा. तरुणांचे विवाह ठरतील व पार पडतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यशप्राप्ती होईल. सामाजिक क्षेत्रातील लोकांना स्वत:च्या क्षेत्रात नाव कमवता येईल. हा महिना तुमच्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे. 
 
वृश्चिक (ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू)
महिन्याची सुरुवात झोकात होणार आहे. महिन्याचे उर्वरीत १५ दिवस फारच आनंददायक असतील. आपल्या मनाचा आवाज ऐका आणि जीव ओतून काम करा, यश नक्कीच मिळेल. जोडीदाराचे वागणे आपल्याला नवे काम करण्यासाठी प्रेरणा देईल. एखाद्या मंदिरात दान केल्याने लाभ होईल. धंदा-व्यवसायात यशाच्या नवीन  सीमा गाठण्याचा तुमचा निर्धार बहुतांश प्रमाणात सफल होईल. तुमचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले जात आहेत, याबाबत तुम्ही खूप सावध असणे गरजेचे आहे. 
 
धनु (ये, यो, भ, भी, भू, धा, फा, ढा, भे)
हा महिना आनंद घेऊन येणार आहे, त्याचे स्वागत करा. नोकरदार लोकांना चांगली बातमी कळेल. व्यापारी वर्गाला लाभ होईल. जीवनात नवा उत्साह संचारेल. शत्रूंवर विजय मिळवाल. वैवाहिक जीवन सुखद जाईल. जोडीदार तुमच्यासाठी ढालीसमान सिद्ध होईल. तुम्हाला तुमच्या चंचल मनावर नियंत्रण मिळवायला हवे, नाहीतर काही अडचणींचा सामना करावा लागेल. जोखीम घेणे टाळा. कारण त्यामुळे तोटा होऊ शकतो. नवीन महिन्यात देणी निर्माण होणार नाहीत याकडे लक्ष द्या. जोडधंदा असणार्‍यांनी नेहमीच्या कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 
 
मकर (भो, जा, जी, खी, खू, खे, गो, गा, गी)
या महिन्याची सुरुवात चांगली होणार आहे. जुन्या कर्जांपासून सुटका मिळेल. हो, जुने कोर्ट-खटले त्रासात टाकू शकतात. मन चंचल होत आहे. त्यावर नियंत्रण ठेवा. अपत्याकडून चांगली बातमी समजेल. सासरकडून सुखद बातमी कळू शकते. नोकरी बदलण्याचे योग आहेत. नको त्या ठिकाणी मानविरुद्ध बदली होण्याची शक्यता आहे.  तुम्ही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्यासाठी तुम्हाला दोष देण्यात येईल. 
 
कुंभ (गू, गे, गो, सा, सि, सु, से, सो, द)
महिन्याची सुरुवात थोडी निराशाजनक असेल. शत्रूंनी तुमच्याविरुद्ध कट रचले आहेत, सावधान राहा. बॉससोबत मतभेद होऊ शकतात. मुलांकडूनही त्रास मिळण्याची शक्यता आहे. आई-वडिलांच्या आरोग्याची चिंता सतावत राहील. तुमच्या तापट स्वभावामुळे नुकसान होणार नही व शत्रुत्व वाढणार नाही, याची विशेष काळजी वर्षभर घ्यावी लागेल.
 
मीन (दी, दू, थ, झ, य, दे, दो, ची)
घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता महिला नवीन खरेदीचे मनसुबे आखतील. गुंतवणुकीत आशानुरूप पैसे परत न मिळल्याने अशांती वाढेल. जोडीदाराचे वागणे खटकणारे असेल. तुमचा राग त्यात आणखी भर टाकू शकतो, त्यामुळे काळजी घ्या. बाहेर खाणे टाळा. व्यवसाय आणि पैशासंबंधी काही व्यवहार करण्याआधी प्रत्येक गोष्टीचे अवलोकन करून अंदाज घ्यावा. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर आधी संस्थेविषयी सगळी माहिती तपासा असा सल्ला आहे.  

सर्व पहा

हरितालिका तृतीयेच्या पूजेत 'या' ५ वस्तू असायलाच हव्यात; चेक करा पूजा साहित्याची यादी

Happy Matrudin Pithori Amavasya Images मातृदिन पिठोरी अमावस्या शुभेच्छा फोटो

हरितालिका तृतीयेला उपवास करताय? 'या' ७ गोष्टी चुकूनही करू नका!

भौम प्रदोषला हे ५ उपाय करा; भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी जाणून घ्या खास महत्त्व

हरितालिका तृतीयेच्या दिवशी हे एक काम नक्की करा; शिव-पार्वतीची कृपा मिळते अशी आहे मान्यता

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

पुढील लेख
Show comments