Festival Posters
✕

Weekly Horoscope साप्ताहिक राशी भविष्य 23 ते 29 ऑक्टोबर 2022

Updated: शनिवार, 22 ऑक्टोबर 2022 (23:16 IST)
 
कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात विविध प्रकारच्या अडचणी व समस्या वाढविणारी ग्रहस्थिती आहे कोणत्याही बाबतीत इतरांवर अधिक प्रमाणात विश्‍वासून राहू नये; अन्यथा भावी काळाच्या दृष्टीने मनस्ताप संभवतो. स्पर्धा परीक्षेत परिश्रम वाढविले तरच यश मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही बाबतीत वस्तुस्थितीचा आढावा घेऊनच अंतिम निर्णय घेणे चांगले ठरेल. सर्वत्र ऐकावे जनाचे करावे मनाचे या उक्तीप्रमाणे वाटचाल करणे.
 
सिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारिक क्षेत्रामधील मतभेद व संघर्ष वाढण्याची दाट शक्यता आहे. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच आवश्यक व श्रेयस्कर ठरेल. क्रीडा क्षेत्रात संघर्ष करूनच यश मिळवावे लागेल. सहकारी वर्ग अपेक्षित सहकार्य करण्यास असर्मथ राहील. अंतिम चरणात संततीबाबत काळजी निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. आर्थिक स्थिती अस्थिर राहील. कर्ज व्यवहार प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत राहतील.
 
कन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रात संघर्ष निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. सहकारी वर्गाबरोबर असणारे मतभेद मानसिक अशांतता निर्माण करण्यास कारणीभूत ठरतील. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच चांगले ठरेल. अंतिम चरणात कार्यसभोवतालीन परिस्थिती थोडी प्रतिकूल राहील. त्यामुळे इतरांबरोबर असणारे वाद अधिक वाढू शकतील. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास असर्मथ स्थितीत राहतील.
 
तूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक मंदावेल व कर्ज व्यवहार प्रकरणे विविध कारणास्तव स्थगितीच्या मार्गावर राहतील. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास असर्मथ स्थितीतच राहू शकतील. अंतिम चरणात परिस्थिती सुधारेल. सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करण्यास तत्पर स्थितीतच राहू शकेल. क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रात कामगिरी चांगली राहील. बक्षीस व मानसन्मान मिळून उत्साह वाढीस लागू शकेल.
 
वृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात मनावर काळजीचे सावट व दडपण राहील. काही बाबतीत मनस्ताप सहन करावा लागेल. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच आवश्यक व श्रेयस्कर ठरेल. परिस्थिती अनुकूल राहील. अंतिम चरणात आर्थिक टंचाईचा सहसा सामना करावा लागणार नाही. कर्ज व्यवहार प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेमधून बाहेर येतील व भावी काळाच्या दृष्टीने आर्थिक अडचणी मिटतील.
 
धनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात विविध कारणास्तव अनावश्यक व मनाविरुध्द खर्च निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. इतरांवर अधिक प्रमाणात विश्‍वासून राहणे अहितकारक ठरू शकेल व भावी काळात अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मनावरील दडपण व काळजीचे सावट मिटण्याच्या मार्गावर राहील व दूर गेलेले यश पुन्हा जवळ येईल. आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी स्वरूपाचे सिध्द होऊन मानसिक आनंद वाढीस लागू शकेल.
 
मकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक टंचाई मिटेल व आर्थिक स्थिती मजबुतीच्या शिखरावर राहील; परंतु काही प्रमाणात अचानक खर्चाच्या प्रसंगास समोर जावे लागेल, विशेष करून पारिवारिक व मित्रमंडळीच्या संदर्भात खर्च करणे आवश्यक स्वरूपाचे ठरेल. अंतिम चरणात इतरांना मदत करावी लागेल. महत्त्वपूर्ण कामासाठी करावा लागणारा प्रवास दगदग व त्रास वाढविणारा ठरू शकेल. 
 
कुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग अगर व्यवसाय, नोकरी आदी क्षेत्रातील अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांबरोबर असणारे मतभेद अधिक वाढणार नाही याची काळजी घेणे उचित ठरू शकेल व होणारा मनस्ताप काही प्रमाणात टळेल. अंतिम चरणात आर्थिक अस्थिरता मिटेल. अचानक धनलाभ योग आहे. त्यामुळे लॉटरी वगैरे या सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. हातात पैसा खेळताच राहील.
 
मीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात प्रवास मार्गात दगदग व त्रास वाढेल. इतरांबरोबर असणारे मतभेद मानसिक अशांतता निर्माण करण्यास कारणीभूत ठरतील. सहकारी वर्गाबरोबर असणारे वाद अधिक वाढवू नयेत, अन्यथा मनस्ताप सहन करावा लागेल. अंतिम चरणात व्यावसायिक प्रगती समाधानकारक राहील व वरिष्ठांबरोबर संबंध सुरळीत राहतील व मतभेद होणार नाहीत. मनोनुकूल व इच्छित स्थळी बदली योग जुळून येतील.

सर्व पहा

Rishi Panchami 2026: १५ सप्टेंबर रोजी ऋषी पंचमी, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि व्रतकथा

Shree Gajanan Maharaj Punyatithi 2026 Vinmra Abhivadan संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी नमन

संत गजानन महाराज निर्वाण दिन: "गण गण गणांत बोते"च्या जयघोषात विसावलेला साक्षात्कार

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ऋषी पंचमी विशेष: पारंपरिक आणि पौष्टिक ऋषींची भाजी Rishi Panchami Naivedyam

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments