suvichar
✕

Lal Kitab Tula Rashifal 2023 तूळ रास भविष्यफळ आणि अचूक उपाय

Updated: शुक्रवार, 16 डिसेंबर 2022 (12:06 IST)
 
लाल किताब तूळ रास 2023 | Lal kitab Tula rashi 2023:
 
तूळ रास करिअर आणि नोकरी 2023 | Libra career and job 2023: लाल किताबानुसार, 2023 हे वर्ष तूळ राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने चढ-उतारांचे असेल. नोकरीतही संमिश्र परिणाम दिसून येतील. बदलीची शक्यता वर्तवली जात आहे. तुम्हाला नोकरीची काळजी करण्याची गरज नाही. नोकरी सोडली तर लगेच दुसरी मिळेल. नोकरीसाठी वर्षाचा मध्य चांगला राहील.
 
तूळ रास व्यवसाय 2023 | Libra business 2023: व्यापारी असल्यास या वर्षी जरा सांभाळून चालण्याची गरज आहे. गुंतवणूकीत धोका कायम आहे. आपल्या सल्ला घेऊन विचारपूर्वक कार्य करण्याची गरज आहे. नाहीतर नुकसान झेलावं लागू शकतं. देण-घेण करताना सावध रहा.
 
तूळ रास दांपत्य जीवन 2023 | Libra married life 2023: दांपत्य जीवनात ताण राहील. आपले खोटे बोलणे महागात पडेल. साथीदारासोबत निभावणे जरा अवघड होईल. क्रोधवर नियंत्रण ठेवले नाही तर आरोप-प्रत्यारोप सुरुच राहील. समस्या गांभीर्याने समजून घेऊन निर्णय घेणे आणि आपले वर्तन चांगले ठेवणे योग्य ठेल. जर तुम्ही अविवाहित असाल तर लग्नाची शक्यता निर्माण होईल.
 
तूळ रास आरोग्य 2023 | Libra Health 2023: लाल किताब प्रमाणे हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीकोनातून चांगले जाणार नाही कारण तुम्ही जेवणाची काळजी घेत नाही. पोट, डोळे आणि मान दुखण्याचा त्रास होऊ शकतो. मात्र आरोग्याकडे लक्ष दिल्यास मे महिन्यानंतर तब्येत सुधारेल.
 
तूळ रास आर्थिक स्थिती 2023 | Libra financial status 2023: आर्थिकदृष्ट्या वर्षाची सुरुवात काहीशी कमकुवत राहील, पण त्यानंतर परिस्थिती सुधारेल. तुमच्या योजना यशस्वी होतील आणि तुम्ही चांगले पैसे कमवू शकाल. परदेशातील व्यवसायात नफा होईल आणि नोकरी केली तर वाढ होण्याची शक्यता आहे.
 
तूळ रास लाल किताब उपाय 2023 | Lal Kitab Remedies 2023 for Libra:
 
- दररोज सुवासिक अत्तर वापरा.
 
- शुक्रवारी अंघोळीच्या पाण्यात अत्तर मिसळून स्नान करा.
 
- दररोज गाय आणि कुत्र्याला पोळी खाऊ घाला.
 
- गुरुवारी गोड भात करुन खा.

सर्व पहा

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

Vaikuntha Chaturdashi 2026: २३ नोव्हेंबर रोजी वैकुंठ चतुर्दशी; शुभ मुहूर्त आणि विधींची माहिती जाणून घ्या

रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करा आणि पाहा चमत्कार! मिळतील हे अद्भूत फायदे

मृत्यूनंतर नाकात आणि कानात कापूस का घातला जातो? गरुड पुराणानुसार यामागचे रहस्य जाणून घ्या

२२ नोव्हेंबर रोजी रवि प्रदोष व्रत: काय करावे, काय टाळावे? • जाणून घ्या पूजेचे नियम आणि फायदे

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments