गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राम मंदिर अयोध्या
Written By
Last Modified: बुधवार, 10 जानेवारी 2024 (18:12 IST)

Ayodhya Ram Mandir Song राम मंदिरासाठी गायले आदर्श शिंदे

अयोध्येतील राम मदिरात 22 जानेवारी रोजी राम लल्लाच्या मूर्तीची प्राण-प्रतिष्ठापना केली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी केवळ अयोध्याच नव्हे तर संपूर्ण देशात उत्साहाचे वातारवण आहे. अवघा देशच श्रीराममय झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आदर्श शिंदे यांनी त्यांच्या दमदार आवाजात नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. राम मंदिरासाठी गायलेल्या या गाण्याला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.
 
अयोध्येचा राजा आपला राम मंदिरी अवतरला आता असे गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात उत्तम ग्राफिक्सचा वापर करून शरयू तीरावरील आरती, श्रीराम मंदिराची दृश्ये दाखवण्यात आली आहेत.
 
प्रभू श्रीराम या म्युझिक व्हिडीओची निर्मिती सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांनी केली आहे. या गीताची संकल्पना साईनाथ राजाध्यक्ष यांची असून विपुल शिवलकर यांच्या गीताला ऋषी बी. यांनी संगीतबद्ध केले आहे.