मुंबई मध्ये घेवू शकाल श्रीराम दर्शन अयोध्येसारखे हुबेहुब मंदिर तयार
Updated: सोमवार, 22 जानेवारी 2024 (13:15 IST)
सात दिवस सकाळ-संध्याकाळ आरती:
२२ जनेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आयोध्यात जेव्हा प्राणप्रतिष्ठा करतील तव्हाच येथील श्रीराम यांची स्थापना होईल. भाजप नेते एड रवि व्यास आणि टीमव्दारा बनवलेले श्रीराम मंदिर जे हुबेहुब अयोध्यातील श्रीराम मंदिराची प्रतिकृति आहे. या मंदिरात रामदरबार सजवला गेला आहे. श्रद्धाळू २२ ते २८ जानेवारी पर्यंत दर्शनाचा लाभ घेवू शकतील. अयोध्येत प्राणप्रतिष्ठावेळी ह्या पूजेची, महाआरतीने याची सुरवात होईल. आणि मोठ्या स्क्रिनवर लोक अयोध्येत होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे लाइव प्रसारण पण पाहू शकतील. संध्याकाळी एक दिवा रामनामसंकल्प सोबत दीपोत्सव साजरा केला जाईल. सात दिवसपर्यंत रोज सकाळ संध्याकाळ महाआरती होईल आणि प्रत्येक दिवशी भजन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होतील. यांत विभिन्न संस्था आणि संस्था व्दारे प्रस्तुत केले जातील.