Dharma Sangrah

अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याविषयी मुख्यमंत्रीच सांगू शकतील: संजय राऊत

Updated: शनिवार, 4 जानेवारी 2020 (16:01 IST)
 
त्यांची नाराजी नेमकी कोणत्या कारणामुळे आहे हे सांगण्यास संजय संजय राऊत यांनी काही भाष्य केलं नाही. जर ते नाराज असतील तर त्यांची नाराजी मी पक्षप्रमुखांना सांगेन. इतकंच त्यांनी माध्यमांना सांगितलं.
 
शिवसेना नेते अनिल परब यांच्याकडे हा राजीनामा दिला अशी बातमी होती. हे वृत्त अनिल परब यांनी फेटाळून लावलं आहे.
 
अब्दुल सत्तार यांचा राजीनामा माझ्याकडे आला नाही किंवा कुणाकडे आला असेल असं मला वाटत नाही, असं शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितलं.
 
शिवसेनेचे सर्व आमदार कट्टर शिवसैनिक आहेत ते कधीही फुटणार नाहीत, असं अनिल परब यांनी एबीपी माझाला सांगितलं.
 
अब्दुल सत्तार यांच्याशी बीबीसी मराठीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. "अब्दुल सत्तार सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात असलेल्या बैठकीत आहेत," असं त्यांच्या खासगी सचिवांनी बीबीसीला सांगितलं. सत्तार यांच्याबरोबर संपर्क होताच ही बातमी अपडेट केली जाईल.
 
अब्दुल सत्तार यांच्या कथित नाराजी नाट्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले असे अनेक 'राजीनामास्त्र' आता तुम्हाला पाहायला मिळतील अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.
 
शिवसेना नेते फुटतील अशी दिवास्वप्न काही लोक पाहत आहेत त्यांच्या पदरी निराशाच येईल असं राऊत म्हणाले.
 
सरकार बनलं पण मलाईदार खात्यांसाठी सध्या भांडण होत आहे. या सरकारच्या पतनाची सुरुवात सरकार बनण्याआधीच सुरू झाली आहे असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
 
पदापेक्षा काम महत्त्वाचं: बच्चू कडू
अब्दुल सत्तार यांच्या कथित राजीनाम्याविषयी बच्चू कडू यांना विचारण्यात आलं. त्यावेळी ते म्हणाले की "सत्तार यांनी राजीनामा दिला की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. पण पदापेक्षा काम महत्त्वाचं आहे. काम कसं करता येईल याकडेअब्दुल सत्तार लक्ष द्यावे असा सल्ला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अब्दुल सत्तार यांना दिला, तीन पक्षाचे सरकार असल्याने सत्तार यांनी घाई करू नये पदापेक्षा आपल्याला कामं कोणती आहेत हे सुद्धा पाहिलं पाहिजे असा सल्ला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सत्तार यांना दिला.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments