शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 26 डिसेंबर 2019 (08:53 IST)

उद्धव ठाकरेंविरोधात पोस्ट लिहिणाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीला शिवसैनिकांनी मारहाण करत त्याचं मुंडन केलं होतं. या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाला आहे.  
 
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या एफआयआरची प्रत ट्वीटरवर शेयर केली आहे.
मुंबईतल्या वडाळा पोलीस स्टेशनमध्ये 4 शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिरामणी तिवारी या व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी शिवसैनिक समाधान जुगदार, प्रकाश हंसबे, सत्यवान, श्रीकांत यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांविरोधात आयपीसी कलम 143, 147, 149, 323, 325, 342, 504, 506, 596 (2) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.