नरेंद्र मोदींनी रफाल प्रकरणी माझ्यासोबत डिबेट का केली नाही - राहुल गांधी
काँग्रेस मुख्यालयात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची पत्रकार परिषद घेऊन त्यांची संपूर्ण निवडणुकांबाबतची भूमिका स्पष्ट केली.
राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे
1. पंतप्रधानांनी पहिली पत्रकार परिषद निकालाच्या 4 ते 5 दिवस आधी होत आहे. ते पहिल्यांदाच एक पत्रकार परिषद घेत आहेत. माझं आव्हान आहे मोदींनी माझ्या रफालवरील प्रश्नांची उत्तरं द्यावी. रफाल प्रकरणी माझ्यासोबत डिबेट का केली नाही? या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यायला हवं.
2. निवडणूक आयोगाची भूमिका भेदभावाची राहिली आहे. मोदींना काहीही बोलण्याची मोकळीक दिली आहे.
3. भाजपकडे आमच्याहून कितीतरी पटीनं अधिक पैसे आहे. पण आम्ही ही निवडणूक सत्यतेवर जिंकणार आहोत.
4. बेरोजगारी, शेतकऱ्यांची परिस्थिती, नोटबंदी आणि जीएसटी या 4 प्रश्नांवर ही निवडणूक झाली.
5. मला पत्रकार कठोर प्रश्न विचारतात. पण मोदींना आंबे कसे खाता, बालाकोटच्या विषयी सांगा, असे प्रश्न विचारतात.
6. नरेंद्र मोदी माझ्या कुटुंबाविषयी द्वेषानं बोलत असतील तरी मी त्यांना प्रेमानंच बोलणार.
7. काँग्रेस पक्षानं विरोधी पक्षाची भूमिका चांगल्या पद्धतीनं निभावली आहे. येत्या 23 मेला ते निकालातून दिसेलच.