Marathi Biodata Maker

खूप खातो म्हणून 'या' माणसाला रेस्टॉरंटने नाकारला प्रवेश!

Updated: शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (20:29 IST)
जास्त खाण्याची क्षमता असणाऱ्या लोकांबाबत हे रेस्टॉरंट भेदभाव करत असल्याचं कांग यांनी सांगितलं.
"मी खूप खाऊ शकतो....यात चूक काय आहे?" असं विचारतानाच सोबतच आपण अन्न अजिबात वाया घालवत नसल्याचं ते सांगतात.
पण कांग आपल्या हॉटेलमध्ये जेवल्याने आपल्याला तोटा होत असल्याचं या रेस्टॉरंटच्या मालकांनी हुनान टीव्हीला सांगितलं.
"दरवेळी ते आले की, माझं काही शे युआनचं नुकसान होतं," त्यांनी सांगितलं.
"अगदी ते सोयामिल्कही 20 ते 30 बाटल्या पितात. पोर्क खायला सुरुवात केली की आख्खा ट्रे संपवतात आणि कोळंबीबद्दल बोलायचं झालं तर सहसा लोकं चिमट्याने प्रॉन्स वाढून घेतात. ते आख्खा ट्रे उचलून टेबलवर नेतात."
फक्त मि. कांगच नाही तर सगळ्याच लाईव्ह स्ट्रीमर्सना आपण रेस्टॉरंटमध्ये यायला मनाई केल्याचं हॉटेलचे मॅनेजर सांगतात.
चीनमधल्या सोशल मीडियावर सध्या ही कहाणी प्रचंड ट्रेंड होतेय. वीबो (Weibo) वर आतापर्यंत 25 कोटीपेक्षा अधिक लोकांनी हा व्हीडिओ बघत त्यांची मतं मांडली आहेत.
काहींच्या मते जर रेस्टॉरंटला परवडणारं नसेल तर मुळात त्यांनी अमर्याद खाण्याची (Unlimited Buffet) ऑफर देऊ नये, तर काहींनी या रेस्टॉरंटच्या मॅनेजरची दया येत असल्याचं म्हटलंय.
चीन सरकारने गेल्यावर्षीपासून खाद्यपदार्थ विषयक व्हिडीओज तयार करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सवर कारवाई करायला सुरुवात केलीय. हे असे व्हिडिओज लवकरच चीनमध्ये बॅन होण्याची शक्यता आहे. चीनमध्ये असलेला अन्नपदार्थांचा तुटवडा लक्षात घेत वाया जाणाऱ्या अन्नाचं प्रमाण लोकांनी कमी करावं असं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटलं होतं.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments