बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

LOC वर कधीही परिस्थिती बिघडू शकते, लष्करप्रमुखांचा इशारा

पाकिस्तानकडून सतत सीमाभागात गोळीबार केला जात आहे. तेथे कधीही परिस्थिती बिघडू शकते त्यामुळे देशाला कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहायला हवे असा इशारा लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिला आहे.
 
कलम 370 हटवल्यापासून पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधी उल्लंघन करण्याचे प्रकार वाढले आहेत. पाकिस्तान देशातील अनियंत्रित वातावरणामुळे सीमेवरची परिस्थिती बिघडत आहे.
 
देशवासियांनी सर्व प्रकारच्या परिस्थितीसाठी लढायला सज्ज राहायला हवे. आम्हीही प्रत्येक परिस्थितीत सामना करायला तयार आहोत असं रावत यांनी सांगितलं.