रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

'प्रादेशिक पक्ष भाजपला पर्याय निर्माण करू शकतील'

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे देशातील विविध पक्षांनी स्वागत केलं असून भाजपला पर्याय म्हणून प्रादेशिक पातळीवर पक्ष उभे राहातील आणि ते राष्ट्रीय पातळीवर भाजपसमोर पर्याय निर्माण करू शकतील असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.
 
हिवाळी अधिवेशनाच्यावेळेस नागपूर दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. समाजमाध्यमांवर निर्णय आणण्याचा मोदी सरकारचा विचार असून त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येईल.
 
अशा प्रकारे येणाऱ्या नियंत्रणाला राष्ट्रवादी काँग्रेस विरोध करेल असं ते म्हणाले. हिवाळी अधिवेशन संपल्यावर दोन-तीन दिवसांमध्ये राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असंही त्यांनी सांगितलं.