Marathi Biodata Maker
✕

आरोग्य: हे आजार टाळण्यासाठी शाकाहारी लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे?

Updated: मंगळवार, 24 सप्टेंबर 2019 (12:49 IST)
 
7,500 लोकांनी पेसेटेरियन (Pescetarian) असल्याचं सांगितलं. म्हणजे हे लोकं मासे खातात पण मांस खात नाहीत.
 
या सगळ्यांकडून सुरुवातीला त्यांच्या आहाराविषयीची माहिती घेण्यात आली. 2010मध्ये पुन्हा एकदा ही माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली.
 
पण फक्त आहारच नाही तर या काळात त्यांची तब्येत कशी होती, धूम्रपान आणि इतर शारीरिक घडामोडी आणि बदलांविषयीची माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली.
 
हृदयाच्या धमन्याशी निगडीत (Coronary Heart Disease) एकूण 2820 प्रकरणं आढळली. तर स्ट्रोक म्हणजे लकवा वा अर्धांगवायूच्या 1072 घटना आढळल्या. यामध्ये ब्रेन हॅमरेज (मेंदूमधील नस फाटणं)च्या 300 घटनांचाही समावेश होता.
 
मांसाहारी लोकांच्या तुलनेत मासे खाणाऱ्यांमध्ये हृदयाच्या धमन्यांशी निगडीत रोगांचा धोका 13%ने कमी होता. तर व्हिगन आणि शाकाहारी लोकांमध्ये हा धोका 22% कमी होता.
 
पण शाकाहारी लोकांना अर्धांगवायूचा धोका 20% जास्त असल्याचं आढळलं. व्हिटामिन बी-12 च्या कमतरता हे यामागचं कारण असू शकतं असं संशोधकांचं म्हणणं आहे. पण यावर अजून संशोधन होणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
अशी ही शक्यता आहे की एखाद्या व्यक्तीचा आहार आणि रोग होण्याचा धोका यामध्ये संबंध नसेल आणि हा कदाचित मांस न खाणाऱ्या लोकांच्या जगण्याच्या पद्धतींतला फरक असेल.
 
व्हिगन आणि शाकाहारी असणं चूक आहे का?
याचं उत्तर 'नाही' असल्याचं ब्रिटिश डाएटेटिक असोसिएशनच्या डॉ. फ्रँकी फिलिप्स म्हणतात. कारण हे एक असं संशोधन होतं जिथे लोकांवर फक्त लक्ष ठेवण्यात आलं होतं.
 
त्या म्हणतात, "त्यांनी लोकांच्या खाण्याच्या सवयींचा अनेक वर्षं अभ्यास केला म्हणून हे एक कारण असू शकतं. पण हे त्यामागचं एकमेव कारण नाही."
 
"लोकांनी योग्य आखणी करून चांगला आहार घ्यावा आणि विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचं सेवन करावं. पण मांसाहारी लोकांनी असं करण्याची गरज नाही. कारण ते भाज्या न खाताही मांस आणि बटाटे खाऊन जगू शकतात."
 
लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या का?
या संशोधनामध्ये सामील झालेल्या लोकांशी संशोधकांनी पुन्हा संपर्क साधला आणि त्यांना त्यांच्या आहाराबद्दल विचारलं.
 
पण व्हिगन आणि शाकाहारी लोकांच्या आहारात बदल झाला असावा असं डॉ. फिलिप्स यांचं म्हणणं आहे.
 
त्या म्हणतात, "हा डेटा काही दशकांपूर्वी गोळा करण्यात आला होता. आजचं शाकाहारी जेवण हे 20 वा 30 वर्षांपूर्वीच्या शाकाहारी जेवणापेक्षा आणि व्हिगन जेवणापेक्षा खूप वेगळं असू शकतं."
 
"व्हिगन आणि शाकाहारी पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे."
 
प्रोसेस्ड फूड म्हणजेच प्रक्रिया करण्यात आलेलं अन्न आणि रेड मीट म्हणजे लाल मांस खाल्ल्याने कॅन्सरचा धोका वाढतो.
 
आपल्या पानात काय असायला हवं?
शाकाहारी आणि मांसाहारी लोकांसाठी संतुलित आहार नेमका कसा असावा हे ब्रिटिश नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या 'इटवेल गाईड'मध्ये सांगण्यात आलंय.
 
दिवसातून किमान पाच प्रकारची फळं आणि भाज्या खाव्यात
बटाटा, चपाती, भात आणि पास्तासारख्या जास्त फायबर आणि स्टार्ट असणाऱ्या पदार्थांचं सेवन करावं.
न विसरता प्रथिनांचं - प्रोटीन्सचं सेवन करावं. कमी फॅट्स असणारं मांस, मासे, डाळी, सोयाबिन आणि बदाम खावेत.
डेअरी किंवा त्यासाठीच्या पर्यायी पदार्थांचा आवर्जून समावेश करावा.
अधिक फॅट्स असणारे पदार्थ, साखर आणि मिठाचं सेवन कमी प्रमाणात करावं.
पण व्हिगन आणि शाकाहारी लोकांना अतिरिक्त पोषकत्त्वांची गरज असते.
 
उदाहरणार्थ जे लोक मांस, दुग्धजन्य पदार्थ आणि मासे खातात त्यांच्या शरीरात सहसा व्हिटॅमिन बी - 12ची कमतरता आढळत नाही. हे आरोग्य, रक्त आणि नर्व्हस सिस्टीमसाठी गरजेचं असतं.
 
पण व्हिगन आहार करणाऱ्यांमध्ये याची कमतरता आढळू शकते. पण बी-12 मिळण्यासाठी अशा व्यक्ती जाड्या धान्याचे वा भरडीचे पदार्थ खाऊ शकतात.
 
ज्यांना मांस खायला आवडत नाही त्यांनी पूर्णपणे धान्य वापरून केलेली भाकरी वा चपाती, सुकामेवा आणि डाळ खाणं गरजेचं आहे.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments