बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 24 सप्टेंबर 2019 (12:41 IST)

बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, ग्राहकांना दिलासा

बँक कर्मचाऱ्यांनी 26 आणि 27 सप्टेंबरला पुकारलेला संप अखेर मागे घेण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारनं घेतलेल्या बँकांच्या विलीनीकरणाच्या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला होता.
  
बँक कर्मचारी संघटनेचे नेते आणि अर्थसचिव राजीव कुमार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.
 
25 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून बँक कर्मचारी संपावर जाणार होते. या संपात ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोशिएशन, इंडियन बँक ऑफिसर्स काँग्रेस आणि नॅशनल ऑर्गनायजेशन बँक ऑफिसर्स या संघटनांचा समावेश होता.