शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: शनिवार, 25 फेब्रुवारी 2017 (15:43 IST)

बोलिव्हिया - चांदीच्या डोंगरांचा देश

दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया देश बर्‍याच जणांच्या ऐकिवातही नसेल. मात्र जगात सर्वाधिक चांदीच्या खाणी असलेला हा देश  आहे व तीच त्याची खरी ओळख आहे. देशाची राजधानी समुद्रपाटीपासून ४0९0 मीटर उंचावर वसलेली असून पोतोसी पर्वतरांगांत वसलेल्या या राजधानीचे नावही पोतोसी असेच आहे.

येथील डोंगररांगात्त १. २२ अब्ज टनांची खनिज संपत्ती आहे व त्यात चाँदीचे प्रमाण सर्वाधिक आहे. पर्यटकांना येथील चांदीच्या डोंगरांचे मोठे आकर्षण आहे. हे पाहता येतात पण दुरून. आत जाण्याची परवानगी दिली जात नाही. ही सारी संपत्ती सरकारच्या ताब्यात  आहे. पोतोसी शहराची गणना जगातील सर्वाधिक उंचीवर वसलेल्या शहरात केली जाते.

 येथील पर्वताला सेरे रिको म्हणजे श्रीमंत पर्वत असे नाव असून या डोंगररांगा ९० किमी परिसरात पसरलेल्या आहेत. या डोंगरात चांदीच्या अनेक खाणी असून आतापर्यंत लक्षावधी टन चांदी बाहेर काढली गेली आहे. येथे आजमितीला ८ हजारांहून अधिक कामगार काम करतात व आतापर्यंत डोंगर पोखरण्यासाठी लावलेल्या सुरूंगामुळे तसेच डोंगर पोखरण्यासाठी लावलेल्या सुरूंगांमुळे तसेच डोंगर पोकळ झाल्याने कोसळलेल्या दरडींमुळे अक्षरश: लक्षावधी लोग प्राणास मुकले आहेत, असे सांगितले जाते.