मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By

Famous Zoo भारतातील पाच प्रसिद्ध प्राणी संग्रहालय

zoo
भारत देशात फिरायला जाण्यासाठी अनेक प्राचीन पर्यटनस्थळे तर आहेच पण आता आधुनिक युगानुसार बदल घडवून अनेक पर्यटनस्थळ विकसित करण्यात आले आहे. अखंड भारताला सौंदर्याचा परिपूर्ण वारसा लाभलेला आहे. आधुनिक काळात विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे, अनेक नवनवीन पर्यटनस्थळे विकसित झाले आहे. त्यापैकीच एक आहेत चिडियाघर म्हणजे प्राणी संग्रहालय. देशात अनेक ठिकाणी प्राणी संग्रहालय विकसित झाले आहे. पण आज आपण भारतातील पाच प्रसिद्ध प्राणी संग्रहालय बद्दल जाणून घेऊया. तसेच सुट्टीमध्ये मुलांना घेऊन जाऊ शकतात. तसेच फिरायला जाऊ शकतात. 
 
Pune zoo
1. राजीव गांधी प्राणी संग्रहालय पुणे-
महाराष्ट्रातील पुण्यामध्ये 130 एकर मध्ये विशाल क्षेत्रात बनवलेले राजीव गांधी प्राणी उद्यान देशातील एकी प्रसिद्ध  प्राणी संग्रहालय आहे. हिरवळीने भरपूर नटलेले राजीव गांधी  प्राणी संग्रहालय पुण्यातील प्रसिद्ध पिकनिक पॉईंट आहे. जिथे तुम्ही पूर्ण कुटुंबासोबत फिरू शकतात. या प्राणी संग्रहालय मध्ये पक्षींची, प्राण्यांची आणि झाडांची अनेक प्रकारच्या जाती पाहावयास मिळतात. जे या प्राणी संग्रहालयचे मुख्य आकर्षण आहे. तसेच इथे लहानमुलांना खेळण्यासाठी उद्यान बनवण्यात आले आहे. तसेच या प्राणी संग्रहालय मध्ये एका भागात एक सुंदर सरोवर देखील आहे. जिथे तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवू शकतात.
 
Mysore zoo
2. म्हैसूर प्राणी संग्रहालय-
म्हैसूर प्राणी संग्रहालय कर्नाटक राज्यातील म्हैसूर मध्ये आहे. ज्यामध्ये विविध प्रकारच्या वन्यजीव प्रजाती आहेत. या उद्यानला श्री चामराजेंद्र जूलॉजिकल गार्डन म्हणून ओळखले जाते. जे भारतातील प्रसिद्ध जूलॉजिकल गार्डन मधील एक आहे. म्हैसूर पॅलेस जवळ स्थित या  प्राणी संग्रहालय स्थापना वर्ष 1892 मध्ये महाराजा चामराजा वोडेयार व्दारा करण्यात आली होती. जे 157 एकर क्षेत्रामध्ये पसरलेले आहे. हे भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन प्राणी संग्रहालय पैकी एक आहे. तसेच या प्राणी संग्रहालय मध्ये सरोवर आहे जिथे तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकतात. तसेच याशिवाय इथे मांजरी, हत्ती आणि जलचरांपासून ते स्थलीय पक्षी आणि सरपटणारे प्राणी पाहू शकतात.
 
Nehur zoo
3. नेहरू प्राणी संग्रहालय हैदराबाद-
हैदराबाद शहरापासून 16 किमी अंतरावर असलेले, नेहरू  प्राणी संग्रहालय हे हैदराबादमधील प्रसिद्ध ठिकाण आहे. हे  प्राणी संग्रहालय 100 पक्षी, प्राणी आणि सरपटणारे प्राणी जसे की भारतीय गेंडा, एशियाटिक सिंह, बंगाल टायगर, पँथर, इंडियन एलिफंट इत्यादींना आश्रय देते. लहान मुलांना खेळण्यासाठी देखील इथे उद्यान आहे. येथील हिरवळ पर्यटकांना आकर्षित करते. 
 
Nainital ZOO
4. नैनिताल प्राणी संग्रहालय
नैनिताल प्राणी संग्रहालय 2100 मीटरच्या उंचीवर नैनितालच्या लायन्स पोल पर्वतावर वसलेले आहे. ज्याला पं. जी.बी. पंतला उच्च उंचीचे प्राणी संग्रहालय असेही म्हणतात. 4.6 हेक्टर क्षेत्रफळात पसरलेले, भारतातील हे प्रसिद्ध प्राणी संग्रहालय मोठ्या संख्येने लुप्तप्राय प्रजातींचे निवासस्थान आहे. तसेच भारतातील सर्वात प्रसिद्ध प्राणी संग्रहालयांमध्ये त्याची गणना केली जाते. या प्राणी संग्रहालय यात काही प्राणी म्हणजे हिमालयन सिव्हेट, हिल पार्ट्रिज, तिबेटी वुल्फ, सांबर, बार्किंग डियर आणि रॉयल बंगाल टायगर हे पाहावयास मिळतात. तसेच पर्यटकांना येथे मोठ्या प्रमाणात पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात.
 
Indira Gandhi Zoo
5. इंदिरा गांधी प्राणी संग्रहालय विशाखापट्टणम-
अंधरप्रदेशातील विशाखापट्टणम येथे इंदिरा गांधी प्राणी संग्रहालय हे पूर्व घाटाच्या मधोमध असलेले एक सुंदर ठिकाण आहे. तसेच ते कंबलकोंडा फॉरेस्ट रिझर्व्हचा एक भाग आहे. सुमारे 625 एकर क्षेत्रात पसरलेले, इंदिरा गांधी  प्राणी संग्रहालय उद्यान हे आंध्र प्रदेशातील सर्वात मोठ्या प्राणी संग्रहालय उद्यानांपैकी एक आहे. जिथे प्राण्यांच्या 100 हून अधिक विविध प्रजाती पाहावयास मिळतात. भारतातील प्रसिद्ध प्राणी संग्रहालय पैकी एक, हे उद्यान चार विभागांमध्ये विभागले गेले आहे.