गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (17:37 IST)

Jwalaji Devi of Kangra कांगडाची ज्वाला देवी

jwala devi
ज्वालाजीदेवी हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात आहे.  ज्वालादेवीला घूमादेवी असेही म्हणतात. 52 शक्तिपीठातील हे सर्वोत्तम स्थान आहे. येथे सतीची जीभ पडली. येथे भगवान शंकर उन्मत्त भैरवरूपात आहेत. येथे देवीचे दर्शन जेतिस्वरूपात मिळते. ही जेती कुठलेही इंधन वगैरे न वापरता चोवीस तास सतत जळत असते. नऊ ठिकाणी ही जेत प्रज्वलित होत असते. म्हणून या देवीया जवालाजीदेवी असे संबोधिले जाते. 
 
गोरीपुरा डेरापासून ज्वालाजी मंदिर 20 किलोमीटर अंतरावर आहे. पठाणकोट मार्गेही या  मंदिराला सरळ येता येते. कांगडा ज्वालाजी दोन तासांचा बस प्रवास आहे. सम्राट भूमिचंद्र याने सतीची जीभ शोधण्याचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला. राजाला देवीची आज्ञा झाली, तो येथील पर्वतावर आला आणि त्याने घनदाट जंगलात ज्वालाजी मंदिर बांधले. या मंदिराचे पुजारी पंडित श्रीधर आणि पंडित कमलापती आहेत. आम्ही भोजक वंशाचे राजपुरोहित आहोत, असे ते सांगतात. 
 
महाभारतामध्ये या ज्वालाजीचा उल्लेख आलेला आहे. धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांनी येथील यात्रा केली. येथील मुख्य जेतीचे नाव महाकाली आहे. येथे अन्नपूर्णा, चण्डी, हिंगराज भवानी, विंध्वासिनी, महालक्ष्मी, विद्यादात्री, सरस्वती, अंबिका, अंजना या जेती आहेत. मंदिर भव्य आहे. आजूबाजूला जंगल आहे. येथील मंदिरामध्ये भाविक गोरख दिब्बीचे दर्शन घेतात. दिब्बी म्हणजे जलकुंड. येथील ज्वाला काही वेळा क्षणभर दिसते नंतर गुप्त होते. येथे गुरू गोरखनाथांची मूर्ती आहे. सेवाभवन हे ज्वालादेवीचे शनस्थान आहे. येथे चांदीचा पलंग (सिंहासन) आहे. जवळच राधा-कृष्ण मंदिर आहे. गोरख दिब्बीच वर लाल शिवाल व सिद्ध मंदिर आहे. अंबिकेश्वर महादेव मंदिर सिद्ध नागाजरुन मंदिरापासून एक फर्लांगभर आहे. त्याच्याजवळ टेढा मंदिर आहे.

Edited by : Smita Joshi