गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. नवरात्र 2023
  3. देवीची मंदिरे
Written By

Mumba Devi Temple 400 वर्ष जुने मुंबादेवी मंदिर, नवसाला पावणारी देवी

Mumba Devi Temple: मुंबईचे मुंबा देवी मंदिर महाराष्ट्रातच नाही तर देशभरात खूप प्रसिद्ध आहे. ही देवी नवसाला पावणारी असून  येथे मनापासून इच्छा मागणाऱ्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
 
लवकरच शारदीय नवरात्रोत्सव सुरू होणार आहे, आता पितृपंधरवडा नंतर नवरात्रोत्सवाची लगबग सुरु होते. देवीचे नऊ दिवसांचा नवरात्रोत्सवात भाविक देवीआईच्या दर्शनासाठी मंदिरात जातात. आज आम्ही मुंबईच्या मुंब्रादेवी मंदिराची माहिती देत आहोत. या देवीआईच्या नावावरून मुंबई हे नाव पडले आहे.  चला मंदिराशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया
 
मुंबईचे प्रसिद्ध मुंबा देवी मंदिर सर्व प्रथम 1737 मध्ये मेंजीस नावाच्या ठिकाणी बांधले गेले जेथे आज व्हिक्टोरिया टर्मिनस इमारत आहे, परंतु नंतर ब्रिटीशांनी ते मरीन लाइन्सच्या पूर्वेकडील भागात मार्केटच्या मध्यभागी स्थापित केले.  त्यावेळी मंदिराच्या तिन्ही बाजूला मोठमोठे तळे होते, जे काळांतराने बुजवण्यात आले आणि आता त्या ठिकाणी मैदान आहे. 
.
मुंबादेवी मंदिर मुंबईच्या भुलेश्वर, येथे आहे.हे मंदिर सुमारे 400 वर्ष जुने आहे. या मंदिराची स्थापना कोळी बांधवानी केली आहे. देवी आईच्या आशीर्वादाने त्यांचा भरभराट झाला. कोळी बांधवांचा असा विश्वास आहे की, मुंबा देवी आई त्यांचे समुद्रापासून संरक्षण करते. 
 
या मंदिराच्या निर्माणासाठी जमीन पांडू शेठ ने देणगी स्वरूपात दिली होती. नंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंदिर ट्रस्ट स्थापित करण्यात आले.आता मंदिर ट्रस्ट या मंदिराची पाहणी करतात.
 
या मंदिरातील देवीची मूर्ती नारंगी रंगाची असून चांदीच्या मुकुटाने सुशोभित आहे. देवीच्या मुर्तीजवळच शेजारी आई अन्नपूर्णा आणि जगदंबेची मूर्ती स्थापित केली आहे. या मंदिरात दिवसातून सहावेळा आरती केली जाते. मंगळवार शुभवार मानला जातो. ही देवी नवसाला पावणारी आहे. भाविक लोक आपला नवस फेडण्यासाठी येथे ठेवलेल्या कठवा (लाकडावर) नाण्यांना खिळे मारून ठोकतात.येथे भाविकांची गर्दी नेहमी असते.    
 
मुंबा देवीची कहाणी -
 
 एका पौराणिक कथेनुसार, मुंबा देवी ही 'मुंबरका' या नावाने ओळखल्या जाणार्‍या दुष्ट राक्षसाचा वध करण्यासाठी ब्रह्मदेवाने पाठवलेली आठ हातांची देवी असल्याचे मानले जाते, ज्याने तिच्या दहशतीने स्थानिकांना घाबरवले. भगवान ब्रह्माजीची प्रार्थना केल्यावर, मुंबा देवी पृथ्वीवर अवतरते आणि दुष्ट राक्षस मुंबरकाला पराभूत करते, त्यानंतर मुंबारकाला तिची चूक कळते आणि तो देवीच्या पायी पडून आणि तिचे नाव घेत, देवीला  क्षमा करण्याची विनवणी करतो . 
 
अशा प्रकारे देवी त्याची विनंती मान्य करते, त्यानंतर तिला मुंबा देवी म्हणून ओळखले जाऊ लागले. याशिवाय देवीने मंदिर बांधण्याची परवानगीही दिली होती.
 
मुंबा देवी मंदिर हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे जिथे मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात आणि त्यांचे नवस करतात. येथून कोणताही भाविक रिकाम्या हाताने जात नाही, असे मुंबादेवी मंदिराचे वैशिष्ट्य आहे.
या मंदिरात प्रवेश घेण्यासाठी कोणते ही प्रवेश शुल्क लागत नाही. 
 
मुंबादेवी मंदिराला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ-
वर्षभरात कोणत्याही मुंबादेवी मंदिराला भेट देता येते, परंतु जर तुम्हाला मुंबादेवी मंदिरासह मुंबईतील इतर पर्यटन स्थळांना भेट द्यायची असेल, तर त्यासाठी हिवाळा हा उत्तम ऋतू आहे. कारण या काळात मुंबईचे हवामान अतिशय आल्हाददायक असते, जे येथे भेट देण्यासाठी योग्य मानले जाते.
 
मुंबादेवी मंदिरात कसे पोहोचायचे-
 
विमानाने -
मुंबादेवी मंदिराला भेट देण्यासाठी मुंबई येथे असलेले छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, ज्यासाठी भारतातील जवळपास सर्व विमानतळांवरून उड्डाणे उपलब्ध आहेत. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबादेवी मंदिरापासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे विमानाने प्रवास केल्यानंतर आणि विमानतळावर उतरल्यानंतर तुम्ही टॅक्सी, ऑटो किंवा स्थानिक वाहनांच्या मदतीने मुंबादेवी मंदिरापर्यंत सहज पोहोचू शकता.
 
ट्रेनने -
मंदिरापासून जवळचे रेल्वे स्टेशन छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्टेशन आहे, जे जगातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे. हे मंदिर रेल्वे स्थानकापासून फक्त 1 किमी अंतरावर आहे, त्यामुळे रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर तुम्ही पायी किंवा ऑटोने मुंबादेवी मंदिरापर्यंत पोहोचू शकता.
 
रस्त्याने-
मुंबईला देशाच्या सर्व भागांशी चांगला रस्ता संपर्क आहे. मुंबादेवी मंदिर मुंबई बस स्टँडपासून फक्त 2.7 किमी अंतरावर आहे. त्यामुळे रस्त्याने किंवा बसने प्रवास करून मुंबादेवी मंदिरापर्यंत सहज पोहोचता येते.