1. धर्म
  2. नवरात्र 2023
  3. नवरात्र उत्सव
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2023 (18:30 IST)

Navratri 2023 : राज्य सरकारची नवरात्रोत्सवासाठी नियमावली जाहीर

Navratri 2023  : येत्या 15 ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रोत्सव सुरु होत आहे. राज्यभरात नवरात्रोत्सवाचा सण दणक्याने साजरा केला जातो. नवरात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात गरबा- दांडियांचे आयोजन केले जाते. या सणासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे.

या नियमावलीनुसार, दांडियाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना दांडियात सहभागी होणाऱ्या लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार असून आयोजनाच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका तयार ठेवायची आहे. हे बंधनकारक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहे. 
 
राज्यात ठीक ठिकाणी नवरात्रोत्सवात नऊ दिवस मोठ्या प्रमाणात दांडिया आणि गरब्याचे आयोजन केले जातात. अलीकडेच तरुणांमध्ये कोरोना नंतर रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे आणि चुकीच्या जीवनशैली मुळे  हृदयविकाराचा झटका आल्याचे प्रमाणात वाढ झाली असून या काळात देखील गरबा  खेळताना हृदय विकाराचा झटका येणाच्या घटना घडतात .या वेळी रुग्णाला तातडीनं वैद्यकीय मदत मिळणे अत्यन्त गरजेचे असते.

मात्र यावेळी कोणतेही वैद्यकीय उपचार वेळीच मिळत नसल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.  या साठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजकांना आयोजनस्थळी आरोग्याच्या सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. आयोजकांच्या वतीने अनेकदा प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध केली जात असून देखील आयोजकांचे याकडे दुर्लक्ष असते. असं होऊ नये या साठी आयोजकांना दांडिया आणि गरब्याचे आयोजन करताना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि सर्व सुविधाने सुसज्ज असलेली रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक असल्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.  
 
 
Edited by - Priya Dixit