महागौरी देवी मंदिर लुधियाना
दुर्गामातेचे आठवे रूप आहे महागौरी, तसेच महागौरी या देवीचे मंदिर पंजाब मधील लुधियाना मध्ये स्थित आहे. गौर अर्थात श्वेत म्हणजे महागौरी म्हणून ओळखली जाते. असे म्हणतात की, पार्वती देवीचे शरीर तपामुळे काळे पडले होते यामुळे भगवान शंकरांनी त्यांना गौर वर्ण प्रदान केला होता. या प्रकारे देवीचे नाव महागौरी असे पडले
तसेच दुर्गा देवीच्या या महागौरी रूपाचे म्हणजे महागौरी देवीचे मंदिर देशात अनेक ठिकाणी आहे पण प्रमुख मंदिर म्ह्णून लुधियानमध्ये असलेले मंदिर ओळखले जाते दरवर्षी लाखोंच्या संख्यने भक्त इथे दर्शनासाठी येतात मंदिर सुंदर असे सजवले जाते तसेच शारदीय नवरात्रीमध्ये इथे विशेष पूजा केली जाते देवी आईचा विशेष शृंगार केला जातो तसेच देवी आईला विशेष नैवेद्य दाखवला जातो कुमारिका पूजन देखील याच दिवशी म्हणजे अष्टमीला केले जाते
असे म्हणतात आपल्या पार्वती रूपात या देवीने महादेवाला पती रुपात प्राप्त करण्यासाठी तप केले होते. या कठोर तपामुळे त्यांचे शरीर काळे पडून गेले होते. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न व तृप्त होऊन जेव्हा भगवान शिवाने गंगेच्या पवित्र पाण्याने त्यांचे शरीर धुतले तेव्हा त्या विजेच्या दिव्यासारखी अत्यंत तेजस्वी झाल्या आणि तेव्हापासून त्यांचे नाव महागौरी पडले.
महागौरी देवी आईला चार भुजा आहे व यांचे वाहन वृषभ आहे. त्यांच्या उजव्या वरच्या हातात अभय मुद्रा आणि खालच्या उजव्या हातात त्रिशूल आहे. वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालच्या डाव्या हातात वर-मुद्रा आहे. त्यांची मुद्रा अतिशय शांत आहे. तसेच असे मानतात की, हीच महागौरी शाकंभरी नावाने हिमालयाच्या रांगेत देवांच्या प्रार्थनेवर अवतरली.
लुधियाना मधील महागौरी मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी विमानमार्ग तसेच रेल्वे मार्गाने देखील जाऊ शकतात लुधियाना मधील रस्ते अनेक मोठ्या शहरांना जोडलेले आहे रस्ता मार्गाने देखील सहज मंदिरापर्यंत पोहचता येते.