शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मे 2019 (16:03 IST)

मुलांबरोबर पिकनिकला जाताना लक्षात घेण्यासारखे ...

धावपळीच्या जीवनात मुलांसाठी आपल्याकडे वेळच नसतो म्हणून आपण सुट्यांची प्रतीक्षा करत असतो. सुट्या लागताच मुलांबरोबर पिकनिकला जाण्याची इच्छा होते. मुलांना फिरायला नेण्याचे निमित्त असतेच आणि आपणही एकदम फ्रेश होऊन जातो. पण, मुलांबरोबर फिरायला जाताना आपण छोट्या-छोट्या गोष्टींचे नियोजन केले तर पिकनिक सुखकर होते. यासाठी आम्ही आपणास काही टिप्स देत आहोत...
* प्रवासास निघण्यापूर्वी वातावरणाचा अंदाज घेऊन कपडे बरोबर घ्या. (उदा. : खूपच उन्ह असेल तर कॅप, गॉगल वगैरे आणि थंडी असेल तर स्वेटर, कानटोपी वगैरे) नदी, तलावाकाठी जात असाल पोहण्याचे कपडे, टॉवेल बरोबर ठेवा. प्रवासावेळी मुलांना मोजे, बूट द्यालण्यास द्यावेत.

* प्रवासावेळी खाण्यापिण्याचे पदार्थ बरोबर घ्या. शक्यतो कोरडे पदार्थ घेण्याचा प्रयत्न करावा. त्याबरोबरच पेपर प्लेट्सही घ्या.
* आवश्यक कागदपत्रे बरोबर असावीत. महत्त्वाची कागदपत्रांची झेरॉक्स बरोबर ठेवा. लायसन्स, पासपोर्ट वगैरे कागदपत्रे जवळ आहेत की नाहीत याची खात्री करा.
* कपड्यांबरोबरच गरजेची औषधेही बरोबर ठेवा. लहान मुलांच्या दृष्टीने औषधे त्याबरोबर त्यांच्यासाठीचे अन्न बरोबर घ्या.
* ज्याठिकाणी जात आहात तेथील हॉटेलचा नंबर व इतर माहिती जवळ ठेवावी. बस अथवा रेल्वेचे वेळापत्रकही माहीत असणे आवश्यक आहे.
* ज्या ठिकाणी फिरायला जात आहात त्याची माहिती करून घ्यावी, तसेच अंतर माहीत करून घ्यावे जेणेकरून वेळेचे नियोजन करता येईल.
* आपल्या बॅगांची संख्या मोजून चढउतार करताना सर्व बॅग बरोबर आहेत की, नाहीत याकडे लक्ष ठेवा
* मुलांना अनोळखी व्यक्तींपासून दूर राहण्याच्या सूचना करा
* रेल्वे, विमान अथवा ट्रॅव्हल्सचा प्रवास असेल तर प्रवासापूर्वी आरक्षण करा.