सध्या जगाच्या पाठीवर सोशल मीडिया धुमाकूळ घालत आहे. लहान मूल जेवत नसेल तर त्याला त्यांच्या हातात मोबाइल देऊन त्यास घास भरविला जातो. नको तितके मोबाइलचे वेड लागले आहे. या मोबाइलच्या गेममुळे कित्येक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या सतत मोबाइल पाहाण्यामुळे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम या विकाराला मुले बळी पडू लागली आहेत. ...