सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 11 मे 2019 (12:43 IST)

बजाजने लॉन्च केली नवीन अॅव्हेन्जर स्ट्रीट 160 एबीएस, किंमत 82 हजार रुपये

मोटरसायकल उत्पादक प्रमुख कंपनी बजाज ऑटोने बीएससह नवीन अॅव्हेन्जर स्ट्रीट 160 मोटरसायकल लॉन्च केली आहे. कंपनीने शुक्रवारी एका वक्तव्यात म्हटलं की स्पोर्टी लुकसह नवीन अॅव्हेन्जर स्ट्रीट 160 मध्ये सिंगल चॅनेल एबीएससह एलईडी डीआरएल्स आणि रोडस्टर डिझाइन हेडलांप, मोठ्या बेजसह नवीन ग्राफिक्स, कमी उंच आणि लांब प्रोफाइल, ब्लॅक एलोय व्हील आणि रबर रीअर ग्रॅब आहे.
 
दिल्लीमध्ये त्याची सर्व-समावेशी एक्स शोरूम किंमत 82,253 रुपये आहे. या मोटरसायकलमध्ये नवीन 160.4 सीसी इंजिन आणि 5 स्पीड गिअर आहे.