Dharma Sangrah

नामदार गोपाळ कृष्ण गोखले

गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (17:30 IST)
गोपाळ कृष्ण गोखले ह्यांचा जन्म 9 मे, 1866 रोजी महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात कोतळूक येथे झाला.ह्यांच्या वडिलांचे नाव कृष्ण महादेव गोखले आणि आईचे नाव सत्यभामाबाई कृष्ण गोखले होते. त्यांचे वडील शेतकरी होते. ह्यांचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे गेले. इथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण देखील झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडिलबंधूं गोविंदराव ह्यांनी स्वतःचे शिक्षण सोडून पत्नीचे दागिने विकून गोपाळ कृष्ण गोखले ह्यांना उच्चशिक्षणास कोल्हापुरातील राजाराम कॉलेज आणि मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजात पाठविले. 1884 मध्ये गणित विषयात बीए ची पदवी मिळवून जानेवारी 1885 मध्ये पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षकाची नौकरी स्वीकारली.नंतर पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्यत्व,फर्ग्युसन कॉलेजात अध्यापन, 1895 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर फेलो म्हणून नियुक्त झाले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या सार्वजनिक सभेचे सचिव बनले .ह्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज, दुष्काळ या  त्रासांचा सखोल अभ्यास करून सरकार कडे निवेदन पाठविले .1905 साली त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली.गोखले पुण्यात न्यायमूर्ती  रानडे ह्यांच्या संपर्कात आले. ते रानडे ह्यांच्या आर्थिक आणि राजकीय विचारांशी खूप प्रभावित झाले.न्यायमूर्ती रानडे एक महान देशभक्तआणि समाज सुधारक होते. गोपाळ गणेश आगरकर ह्यांनी सुरू केलेल्या 'सुधारक' च्या इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी नामदार गोखले ह्यांनी सांभाळली.सार्वजनिक सभा,वृत्तपत्रातून ते लिखाणाद्वारे समाज सुधारणांचा पाठपुरवठा सतत करायचे. 1902 साली मध्यवर्तीय कायदेमंडळावर निवड झाल्यावर ते नामदार झाले. त्यांच्यातील क्षमतेला बघून व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो ह्यांनी गोखले ह्यांना मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करण्यास सांगितले.त्या दरम्यान त्यांनी पार्लियामेंटच्या सदस्यांना भेटून भारतातील समस्या आणि त्याचे प्रश्न त्यांच्या कानी घातले.ते भारतातील पहिल्या श्रेणीचे अर्थतज्ज्ञ होते.  हे भारतामधील ब्रिटिश साम्राज्य विरोधात स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणारे राजकीय आणि सामाजिक नेता होते. आपला साधा स्वभाव, बौद्धिक क्षमता आणि देशासाठी दीर्घकाळ निःस्वार्थ सेवा करण्यासाठी त्यांना नेहमी स्मरले जाईल. ते इंडिया पब्लिक सर्व्हिस सोसायटीचे संस्थापक आणि अध्यक्ष होते. ते उदारमतवादी विचारसरणीचे अग्रगण्य घटक होते.ते 1905 मध्ये स्वातंत्र्याच्या पक्षात लाला लाजपतराय ह्यांचा सह इंग्लंडला गेले आणि अतिशय प्रभावी पणे देशाच्या स्वतंत्रते बद्दल बोलले. 19 फेब्रुवारी 1915 रोजी गोपाळ कृष्ण गोखले ह्यांचे निधन झाले.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

Shivrajyabhishek Din 2026 Wishes in Marathi शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा

बाबा, मी ठीक आहे," असं म्हणत नवविवाहिताची गळफास घेऊन आत्महत्या बीडची घटना

मराठा आरक्षण आंदोलनात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना फडणवीस सरकार प्रत्येकी १० लाख रुपये देणार

पुण्यातील हिंजवडी येथील विप्रोमध्ये टीसीएस सारख्याच प्रकार घडल्याचा माजी कर्मचाऱ्याचा दावा

विराट, रोहित आणि हार्दिक जखमी, तिघेही अफगाणिस्तान एकदिवसीय मालिकेतून बाहेर

पुढील लेख
Show comments