शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. बॉयोग्राफी
Written By
Last Modified: सोमवार, 2 नोव्हेंबर 2020 (14:28 IST)

भारताची प्रथम महिला पंतप्रधान 'इंदिरा गांधी'

भारताची प्रथम स्त्री पंतप्रधान इंदिरा गांधी. ज्यांनी केवळ भारताचे राजकारणावरच वर्चस्व गाजवले नाही तर जागतिक राजकारणाच्या क्षितिजा वर आपली एक अमिट छाप सोडली आहे. याच कारणास्तव त्यांना लोह महिलेच्या नावाने संबोधले जाते. 
 
श्रीमती इंदिरा गांधी यांचा जन्म नेहरू यांचा कुटुंबात झाला. त्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा एकमेव कन्या असे. आज इंदिरा गांधी यांना केवळ पंडित नेहरू यांची कन्या म्हणूनच नव्हे तर त्यांना त्यांची प्रतिभा आणि राजकीय दृढतेसाठी 'जागतिक राजकारणाच्या इतिहासात नेहमीच ओळखल्या जातील.
 
इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी उत्तर प्रदेशातील इलाहाबाद येथे एका समृद्ध कुटुंबात झाला होता. त्यांचे पूर्ण नाव 'इंदिरा प्रियदर्शनी' होते. त्यांचे घराचे नाव 'इंदू' देखील होते. यांचा वडिलांचे नाव जवाहरलाल नेहरू आणि आजोबांचे नाव मोतीलाल नेहरू होते. यांचे वडील आणि आजोबा दोघेही वकिलीच्या व्यवसायात होते आणि देशाच्या स्वातंत्रतेच्या लढासाठी त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. यांच्या आईचे नाव कमला नेहरू होते. 
 
इंदिराजींचा जन्म अश्या कुटुंबात झाला जे आर्थिक आणि बौद्धिक दृष्टीने समृद्ध होतं. त्यांचे इंदिरा नाव त्यांचा आजोबाने दिले असे. ज्याचा अर्थ आहे कांती, शोभा आणि लक्ष्मी. या मागील कारण असे की त्याच्या आजोबांना असे वाटत होते की त्यांचा घरात नात म्हणून आई लक्ष्मी आणि दुर्गाची प्राप्ती झाली आहे. त्या खूप प्रिय असल्यामुळे पंडित नेहरू त्यांना प्रियदर्शनी म्हणून संबोधित करत होते. जवाहर लाल नेहरू आणि कमला नेहरू हे दोघेही आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे मालक होते, या मुळे सौंदर्य त्यांना जणू वारसातच मिळाले होते. इंदिरा यांना 'गांधी' टोपण नाव फिरोज गांधी यांच्याशी लग्न केल्यानंतर मिळाले होते.
 
इंदिरा यांना लहानग्यावयात देखील स्थैर्य कौटुंबिक जीवन अनुभवता आले नाही. कारण त्यांचा आईचे 1936 साली निव्वळ वयाच्या 18 व्या वर्षी क्षय रोगामुळे निधन झाले. त्यांचे वडील स्वातंत्र्याच्या चळवळीत व्यस्त असे. 
 
नेहरू हे शिक्षेला फार महत्त्व देत होते. म्हणून त्यांनी इंदिराच्या प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था घरातच केली. नंतर एका शाळेत त्यांचा दाखला घातला. सन 1934 -35 मध्ये शाळेचे शिक्षण पूर्ण करून इंदिराने शांतिनिकेतन मध्ये रवींद्रनाथ टागोरने स्थापित केलेल्या 'विश्व भारती' विद्यापीठात प्रवेश घेतला. 
 
या नंतर त्यांनी 1937 साली त्यांनी ऑक्सफोर्ड मध्ये दाखल घेतला. लहानपणापासूनच त्यांना पुस्तक वाचण्याची खूप आवड होती. याचा फायदा म्हणजे त्यांनी पुस्तकांमधून केवळ सामान्य ज्ञानापूर्ती मर्यादितच नव्हे तर त्यांना जगभराचे ज्ञान मिळाले आणि त्या अभिव्यक्तीच्या कलेत पारंगत झाल्या. शाळेतल्या वक्तृत्व स्पर्धेत त्यांचा सामना कोणीही करत नसत. 
 
त्या एक मध्यम वर्गाच्या विद्यार्थिनी होत्या. इंग्रजीच्या व्यतिरिक्त इतर विषयांमध्ये त्यांना कौशल्य मिळवता आले नाही. पण इंग्रजी भाषेवर त्यांची चांगली पकड होती. त्याचे कारण असे की त्यांचा वडिलांनी त्यांना इंग्रजी भाषेत लिहिलेले पत्र. नेहरू यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. लॉर्ड माउंटबॅटन यांची इंग्रजी सुद्धा त्यांचा पुढे मंद होती.
 
1942 साली यांचे लग्न फिरोज गांधी यांचा सह झाले. हे त्यांचे प्रेम विवाह होते. फिरोज हे पारशी होते. त्या दोघांची भेट ऑक्सफोर्ड विद्यापीठात शिकत असताना झाली. त्यावेळी ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे शिक्षण घेत असे. नंतर दोघांची मैत्री झाली आणि त्यांनी लग्न करण्याचे ठरवले. पण त्यांचे वडील पंडित नेहरू या लग्नासाठी तयार नव्हते. त्यांचे म्हणणे होते की लग्न आपल्या जातीचं व्हावे. स्वतः त्यांनी आपल्या वडिलांची मोतीलाल नेहरू यांचा आज्ञांचे पालन केले होते. 
 
त्यांनी इंदिराला समजावयाचा प्रयत्न केला पण त्यांनी अजिबात ऐकले नाही. परिणामी त्यांना होकार द्यावाच लागला. 
 
लग्नानंतर 1944 साली इंदिरा यांना राजीव आणि संजय नावाचे दोन मुलं झाले. सुरुवातीस त्याचे वैवाहिक जीवन चांगले चालले नंतर त्याचा मध्ये मतभेद होण्यास सुरुवात झाली. बऱ्याच वर्ष त्यांनी आपले नातं सांभाळण्याचा प्रयत्न केला पण काहीच झाले नाही. दरम्यान 8 सप्टेंबर 1960 इंदिरा आपल्या वडिलांसह परदेश दौऱ्यावर गेलेल्या असताना फिरोज गांधी यांचे निधन झाले.
 
प्रियदर्शनी यांना त्यांचा कौटुंबिक वातावरणात राजकीय विचारसरणी वारसात मिळाली. त्या 1941मध्ये ऑक्सफोर्ड वरून परत आल्यावर भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत सामील झाल्या. त्यांनी 1947 मध्ये भारत फाळणीच्या वेळी निर्वासित छावण्या आयोजित करून पाकिस्तानातून आलेल्या लाखो निर्वासितांना वैद्यकीय सेवा पुरविण्यास मदत केली. ही त्याची मोठी सार्वजनिक सेवा होती. या मुळे त्यांचा पक्ष उंचावला.
 
वयाच्या 42 व्या वर्षी 1959 मध्ये त्या कांग्रेस पक्षाच्या अध्यक्ष झाल्या. अश्या प्रकारे पक्षाच्या बऱ्याच लोकांनी पंडित नेहरू यांचा वर पक्षात कुटुंब वाद पसरविण्याचा दोष दिला. 27 मे 1964 नेहरूंच्या निधनानंतर इंदिरा निवडणूक जिंकून माहिती आणि प्रसारण मंत्री पदावर रुजू झाल्या. 11 जानेवारी 1966 भारताचे दुसरे पंतप्रधान श्री लाल बहादुरशास्त्री यांचे अकाली निधनानंतर 24 जानेवारी 1966 श्रीमती इंदिरागांधी भारताच्या तिसऱ्या आणि प्रथम महिला पंतप्रधान झाल्या. या नंतर त्या सलग तीन वेळा 1967 - 1977 आणि चवथ्या वेळी 1980-84 देशाच्या पंतप्रधान झाल्या.
 
1967 च्या निवडणुकीमध्ये त्या अगदी अल्प बहुमताने जिंकल्या पण 1971 मध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने पंतप्रधान झाल्या आणि त्या 1977 पर्यंत राहिल्या. 1977 नंतर 1980 मध्ये पुन्हा एकदा त्या पंतप्रधान झाल्या आणि 1984 पर्यंत पंतप्रधान राहिल्या. 
 
तब्बल 16 वर्ष त्या भारताच्या पंतप्रधान राहिल्या. त्यांचा कारकीर्दीत अनेक चढ-उतार झाले. पण इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये आणीबाणीच्या वेळी, 1984 मधील शीख दंगली सारख्या अनेक मुद्द्यांवर प्रचंड निषेध आणि तीव्र टीकेला सामोरी जावे लागले. 
 
असे असून ही रशियन क्रांतीच्या वर्षात जन्मलेल्या इंदिरा गांधी यांनी 1971 च्या युद्धात जागतिक ताकदीपुढे न वाकण्याची नीती आणि वेळेवर निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे पाकिस्तानाचा पराभव केला आणि बांगलादेशाला मुक्त करवून स्वतंत्र भारताला नवा अभिमान देणारा क्षण दिला. पण 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांना त्यांचाच एका अंगरक्षकाने गोळी घालून ठार मारले. देशाच्या ऐक्य आणि अखंडतेसाठी त्यांनी स्वतःला त्यागिले.