गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. जन्मदिवस आणि ज्योतिष
Written By
Last Modified: शनिवार, 24 नोव्हेंबर 2018 (00:13 IST)

दैनिक राशीफल 24.11.2018

मेष : काही गोष्टी आपल्या जीवनात आकस्मिकरीत्या आनंद आणतील. आपल्या नवीन आवडींना प्रोत्साहन द्या आणि जीवनात आलेल्या या परिवर्तनाचा आनंद घ्या. एखादी विषम परिस्थती उद्भवण्याआधी आपली आर्थिक स्थिती तपासून स्थिती पाहा. 
 
वृषभ : आजचा दिवस आपणास पैसे मिळवण्याच्या आणि व्यापाराच्या नव्या संधी देईल परंतु घाई करणे अडचणीत टाकू शकते. आज रात्री विश्रांती घ्या. रहाते घर  बदलण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. 
 
मिथुन : आज आपला जोडीदार किंवा प्रिय व्यक्ती त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्यावर दबाव आणू शकतो. घरगुती बाबतीत अधीरता टाळा. 
 
कर्क : आर्थिक बाबतीत काळ अनुकूल आहे. सामाजिक कार्यांमध्ये सहयोग अनुकूल राहील व मान-सन्मान वाढेल. राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषजनक राहील. आर्थिक लाभ होईल. 
 
सिंह : मानसन्मानाच्या क्षेत्रात वाढ होईल. कामात एखाद्याचे सहकार्य प्रगतीचे कारण बनेल. आर्थिक विषयांमध्ये थोड्या अडचणी येऊ शकतात. 
 
कन्या : करीयरसंदर्भातील नवी संधी मिळण्याची शक्यता. त्यामुळे घरांत उत्साहाचे वातावरण होईल. ठरविलेले पूर्ण करण्यासाठी असे प्रसंग प्रेरणादायी ठरतील.
 
तूळ : यथायोग्य विचार करून कार्य करा. निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. आरोग्याची काळजी घ्या. व्यापार व्यवसायात वेळ साधारण राहील. देवाण-घेवाण टाळा. 
 
वृश्चिक : मित्रांचा आधार मिळेल. एखादे महत्त्वाचे कार्य पूर्ण झाल्याने आपल्या प्रश्नांची सोडवणूक होईल. अपत्यांपासून आनंद प्राप्तीचे योग. आरोग्य उत्तम राहील. 
 
धनू : प्रवासाचा एक चांगला योग संभवतो परंतु त्यासाठी आपणास फार मोठी किंमत द्यावी लागू शकते. या प्रवासाच्या खर्चात काटकसर करण्याचे मार्ग शोधा. अनुभवी लोकांची मदत घ्या. आपल्या वेळेचा योग्य उपयोग करा. 
 
मकर : आपणास एखाद्या योजनेसाठी इतरांचे सहकार्य हवे असेल तर तसे सांगण्यास मागे-पुढे पाहू नका. आपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. 
 
कुंभ : आजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ आहे. ज्यांच्याबरोबर आपणास वेळ घालवणे आवडते त्यांना वेळ द्या.
 
मीन : बेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य राहील.