1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 24 फेब्रुवारी 2024 (16:19 IST)

लग्नापूर्वीच्या गरोदरपणावर अभिनेत्री दिव्या अग्रवालची प्रतिक्रिया

divya agarwal
बिगबॉस ओटीटी 1 विजेती अभिनेत्री दिव्या अग्रवाल हिने अपूर्व पाडगावकर सोबत 20 फेब्रुवारी रोजी लग्न केले. तिच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहे. 
 
ती लग्नाअगोदर तिच्या प्रेग्नेंसीमुळे  चर्चेत होती. आता तिने या प्रेग्नेंसी बाबत आपले मौन तोडले आहे. तिच्या लग्नानंतर पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे या मध्ये तिच्या पोटाचा आकार पाहून युजर्सने ती गरोदर असल्याचे म्हटले. तिचा डान्सचा व्हिडीओ  लोकप्रिय झाला आहे. या वर युजर्स ने ती गरोदर असल्याचे विचारले आहे. या वर तिने क्रिप्टीक नोट देऊन सर्वांची बोलती बंद केली. तिने लिहिले कोणाच्या ही  रंगरूपावर चर्चा कशाला करायचा , तू इतकी जाड आहे का, इतकी काळी  आहे का कशाला हवं ? तुम्ही सुंदर आहात असे म्हणा प्रत्येक वेळी फालतू बोलण्याची जाहीच गरज नाही भाऊ . 

दिव्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा तिने अपूर्व पाडगावकरला पाहिले तेव्हापासून तिला त्याच्याशी लग्न करायचे होते. तथापि, अपूर्व वचनबद्धतेसाठी तयार नव्हते, म्हणून ते 2018 मध्ये वेगळे झाले, परंतु दोघे पुन्हा एकत्र आले. 20 फेब्रुवारीला दिव्या आणि अपूर्वाचे लग्न अगदी साधेपणाने झाले. त्यांचा विवाह सोहळा मुंबईत पार पडला आणि फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते.
 
 Edited by - Priya Dixit