सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (15:51 IST)

राखीने आदिलविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली

rakhi sawant
राखीने आदिलविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर ओशिवारा पोलिसांनी त्याला ७ फेब्रुवारीला अटक केली होती. त्यानंतर आदिलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
 
आदिलला अंधेरी न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. २० फेब्रुवारीपर्यंत आदिल पोलीस कोठडीत असणार आहे. आदिलला आज पुन्हा अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्याला कोर्टात घेऊन जातानाचा व्हिडीओ समोर आला आहे. इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन आदिलचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये आदिलला कोर्टात हजर करण्यासाठी पोलीस घेऊन जात असल्याचं दिसत आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor