1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 एप्रिल 2024 (12:16 IST)

अजय देवगण Rolls Royce मध्ये लिंबू-मिरची लटकवतात

अजय देवगण यांचा आज वाढदिवस आहे. बॉलीवुडमध्ये सिंघम म्हणून प्रसिद्ध अजय देवगन यांच्या गॅरेजमध्ये अनेक लक्झरी कार आहेत. असे असणे स्वाभाविक असले तरी विशेष लक्ष वेधून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सुपर लग्झरी कार्स यांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी ते देखील अगदी सामान्य माणसाप्रमाणे लिंबू-मिरची लटकवतात.
 
अजय आलिशान कारचे शौकिन आहे. 2006 मध्ये अजयने 2.8 कोटी रुपयांची मसेराती क्वाट्रोपोर्ट (Maserati Quattroporte) कार खरेदी केली होती. अजयने ही कार भारतात सर्वप्रथम खरेदी केली होती. त्यावेळी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींकडे सुद्धश ही कार नव्हती. ही कार खरेदी करून अजय देवगण चर्चेत आले होते.
 
मागील वर्षी देखील अजय यांनी सुपर लक्झरी इलेक्ट्रिक कार BMW i7 खरेदी केली, ज्याची किंमत 1.95 कोटी रुपये होती. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास BMW i7 मध्ये 101.7kWh लिथियम-आयन बॅटरी आहे, जी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 625 किलोमीटरपर्यंत धावू शकते. यात दोन इलेक्ट्रिक मोटर्स आहेत, जे 544 HP पॉवर आणि 745 Nm चा पीक टॉर्क जनरेट करतात. त्याचा टॉप स्पीड 239 किमी प्रतितास आहे.
 
Rolls Royce मध्ये लटकवण्यात येते लिंबू-मिरची
अजय देवगणकडे 6.95 कोटी रुपयांची Rolls-Royce Cullinan देखील आहे. अजय अनेकदा या कारमध्ये फिरताना दिसतो. वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी कारच्या पुढील बाजूस लिंबू आणि मिरची टांगली जाते. Rolls-Royce Cullinan 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 6.7-लिटर 12-सिलेंडर V12 इंजिनद्वारे समर्थित आहे. याशिवाय अजयकडे मर्सिडीज मे-बॅक DGLS600, Audi A5, BMW X7, Audi Q7 आणि Range Rover सारख्या गाड्या आहेत ज्यांची किंमत करोडोंमध्ये आहे.
 
Cullinan च्या पुढील बंपरखाली दोरीने बांधलेले लिंबू-मिरची कॅमेर्‍यात कैद झाल्यापासून याची चर्चा आहे. भारतात लोक सहसा वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी एका दोर्‍यात लिंबू-मिरची बांधून घरासमोर आणि वाहनांसमोर टांगतात. काही भागांमध्ये हे एक लकी चार्म देखील मानले जाते. अशात अभिनेत्याला त्याच्या मौल्यवान मालमत्तेचे वाईट नजरेपासून संरक्षण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मानले जात आहे.