1. धर्म
  2. हिंदू
  3. तीर्थ-क्षेत्र
Written By

द्वारिका धाम बद्द्ल 5 मनोरंजक गोष्टी

Dwarikadhish Dham Mandir Temple : हिंदूंच्या चार धाम मधील द्वारिका हे श्री कृष्णाचे निवास स्थान मानले जाते. महाभारत काळात मथुरा अंधक संघाची राजधानी तर द्वारिका वृष्णियांची राजधानी होती. या दोन्ही यदुवंशची शाखा होत्या. असे म्हणतात की, मथुरातून द्वारकेला जाण्यासाठी सरस्वती नदीतून जाण्याकरिता जहाजाचा उपयोग केला जायचा. चला तर जाणून घेऊ या श्रीकृष्णाच्या द्वारिकेबद्द्ल 5 मनोरंजक गोष्टी 
 
1. श्रीकृष्णाची द्वारिका कोणी बनवली होती- सप्तपुरीं मध्ये एक द्वारिका आहे. भगवान श्रीकृष्णाची प्रिय नगरी द्वारिकाचे निर्माण विश्वकर्मा आणि मयदानव ने मिळून केली होती. असे म्हणतात की, विश्वकर्मा देवतांचे तर मयदानव असुरांचे शिल्पकार होते. ययाति चे प्रमुख पाच पुत्र होते. 1. पुरु, 2. यदु, 3. तुर्वस, 4. अनु आणि 5. द्रुहु. यांतील यदुला त्याच्या वडिलांनी दक्षिणमध्ये राहण्यास स्थान दिले होते. जे आजचे सिन्ध-गुजरात प्रांत आहे. या किनाऱ्यावर श्रीकृष्णाने द्वारिका निर्माण केली होती. तसेच याला कुशस्थली देखील म्हणायचे. पौराणिक कथानुसार महाराज रैवतकने समुद्रातून भूमि बाहेर काढून इथे एक नगरी वसवली होती. इथे त्यांनी द्वारका कुश पसरवून यज्ञ केल्या मुळे  याला कुश्लस्थली संबोधले गेले. तसेच इतर मान्यतामुळे रामाचे पुत्र कुशचे वंशज यांनी वसवले होते. हे देखील बोलले जाते, इथेच त्रिविक्रम भगवान ने 'कुश' नावाच्या दानवाचा वध केला होता म्हणून याला कुशस्थली पण संबोधले जाते.  पण इथे महाराजा रैवतकने आपली नगरी वसवली होती. सतयुगचे राजा आनतनंदन सम्राट रैवतचे पुत्र महाराज कुकुदनीची पुत्री रेवतीचा विवाह बलरामजीशी  झाला होता. 
 
2. द्वारिका का संबोधले- श्रीकृष्णने मथुरातुन आपल्या 18 कुळचे हजारों लोकांसोबत पलायन केले. तर ते कुशस्थली आले होते आणि इथेच त्यांनी नवीन नगरी वसवली आणि त्याचेनाव त्यांनी द्वारका ठेवले. ही अभेद्य दुर्ग होती. जिला शेकडो दरवाजे होते म्हणून द्वारका संबोधले जाते. द्वारकेवर जरासंध आणि शिशुपाल यांनी अनेक वेळेस आक्रमण केले.  
 
3. द्वारिका का कशी नष्ट झाली- पुराणांनुसार द्वारिकेचा विनाश समुद्रात बुडाल्यामुळे झाला. पण असेमानले जाते की, पण समुद्रात जाण्यापूर्वी शत्रूंनी नष्ट केली होती. द्वारिका समुद्रात बुडणे व यादव कुळ नष्ट झाल्यानंतर श्रीकृष्णाचे प्रपौत्र वज्र अथवा वज्रनाभ द्वारिकाचे यदुवंशचे अंतिम शासक होते. जे यादवांच्या आपापसातील  झालेल्या युद्धात जीवित होते. द्वारिका समुद्रात बुडाल्या नंतर अर्जुन द्वारिकेला गेले आणि वज्र तसेच शेष राहिलेले  यादव महिलांना हस्तिनापूरात घेऊन गेले. श्रीकृष्णाचे प्रपौत्र वज्रला हस्तिनपुरात मथुरेचा राजा घोषित केले. वज्रनाभच्या नवाने मथुरा क्षेत्रला ब्रजमंडल संबोधले जाते. 
 
शास्त्रज्ञानुसार, जेव्हा हिमयुग समाप्त झाले तेव्हा समुद्राचा जलस्तर वाढला आणि त्यात देश-जगातील अनेक किनारा असलेले शहर बुडाले . द्वारिका देखील त्यातीलच एक होती. पण प्रश्न हा निर्माण होतो की, हिमयुग तर दहा हजार वर्षा पूर्वी समाप्त झाले होते. भगवान श्रीकृष्णने नव्या द्वारिकाचे निर्माण पाच हजार तीनशे वर्षा पूर्वी केले होते. तर हिमयुग दरम्यान समुद्रात बुडण्याची कल्पना अर्धी खरी वाटते. 
 
 एका डॉक्यूमेंट्री सीरीज 'एंशियंट एलियन' मध्ये अशा प्रकरचा दावा केला गेला आहे की, द्वारिकेला एलियंस ने बनवले होते  आणि त्यांनीच तिला नष्ट केले होते. जरी 'एंशियंट एलियन' सीरीज  अनुसार ही पण शक्यता वर्तवली जाते की  शक्यता आहे की  श्रीकृष्णांचा सामना एलियनशी झाला आणि  मग दोघांमध्ये घोर युद्ध झाले असेल ज्यामुळे द्वारिका नष्ट झाली. 
 
4. समुद्रात द्वारिकेला केव्हा शोधले- समुद्रात तळाशी मोठया प्रमाणात द्वारिकेचे अवशेष मिळाले आहे. यामुळे असे समजतेकी द्वारिका नगरी ही खूप सुंदर होती. या शहराच्या चारही बाजूंनी ऊंच अश्या भिंती होत्या व त्यात अनेक दरवाजे होते. त्या भिंती आजतायागत  समुद्रात आहे. समुद्रातील द्वारिकेच्या अवषेशांना सर्वात पहिले भारतीय वायुसेनेच्या पायलटांनी समुद्राच्या वरून  उडतांना पाहिले होते. आणि त्या नंतर 1970 मध्ये जामनगरच्या गजेटियर मध्ये यांचा उल्लेख केला गेला आहे. नंतर ऑर्कियोलॉजिस्‍ट प्रो. एसआर राव आणि त्यांच्या टीम ने 1979-80 मध्ये समुद्रात  560 मीटर लांब द्वारिकेची भींत शोधली होती. सोबतच तिथे त्यांना त्या वेळीचे भांडे पण मिळाले. जे 1528 ईसा पूर्व ते  3000 ईसा पूर्वचे आहे. पाहिले 2005 मग 2007 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे निर्देशनमध्ये भारतीय नौसेनाचे पाणबुडयांनी समुद्रमध्ये सामावलेली द्वारिका नगरीचे अवषेशांना यशस्वीपणे बाहेर काढले होते. त्यांनी अश्या वस्तु एकत्रित केल्या ज्यांना पाहून आश्चर्य वाटते. 2005 मध्ये नौसेनाच्या सहयोगाने प्राचीन द्वारिका नगरीशी जोडलेले अभियान दरम्यान समुद्राच्या तळाशी कापलेले-तुटलेले दगड मिळाले आणि कमीतकमी 200 नमूने एकत्र केले गेले. मिळालेल्या माहितीनुसार हे नमूने सिन्धु घाटी सभ्यताशी मिळते-जुळते नाही पण हे एवढे प्राचीन होते की सर्व आश्चर्यचकित झाले. 
 
5.द्वारिका धामची यात्रा- जर तुम्ही द्वारिकेच्या यात्रेला जात असाल तर जाणून घ्या की, द्वारिका 2 आहेत. गोमती द्वारिका, बेट द्वारिका. गोमती द्वारिका धाम आहे, बेट द्वारिका पुरी आहे. बेट द्वारिकासाठी समुद्र मार्गाने जावे लागते. चार धाम मधील  एक द्वारिका धाम मंदिर कमीतकमी 2 हजार पेक्षा अधिक वर्ष जुने आहे. द्वारिकाधीश मंदिर पासून कमीतकमी 2 किमी दूर एकांतात रुक्मिणीचे मंदिर आहे. ज्या स्थान वर त्यांचे हरि गृह' होते तिथे आज प्रसिद्ध द्वारिकाधीश मंदिर आहे. आणि शेष नगरी समुद्रात आहे.द्वारिकाधीश मंदिर सामान्य जनतेसाठी सकाळी 7 ते रात्री 9:30 पर्यंत सुरु असते. तसेच दुपारी 12:30 ते संध्याकाळी 5 पर्यंत बंद राहते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik