शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 7 ऑक्टोबर 2024 (14:54 IST)

Singham Again Trailer release: अजय देवगणच्या सिंघम अगेन चित्रपटाचे ट्रेलर रिलीज

singham again
social media
अजय देवगणच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. सिंघम अगेनची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलर मध्ये सर्व कलाकारांची झलक बघायला मिळत आहे. हा ट्रेलर समोर येतातच खळबळ उडाली आहे. 

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्स मालिकेतील हा पाचवा चित्रपट आहे, जो बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास सज्ज आहे.
हा ट्रेलर हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात मोठा ट्रेलर आहे. हा 4:58 सेकंदाचा आहे. या चित्रपटात अजय देवगण, करीना  कपूर, अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग, आणि अर्जुन कपूर इत्यादी कलाकारांचा समावेश आहे. 
या चित्रपटात अर्जुन कपूर खलनायकाच्या भूमिकेत आहे.अर्जुन कपूर आणि अजय देवगण यांच्यात टक्कर होणार आहे. चित्रपट 1 नोव्हेंबर 2024 रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. 
Edited by - Priya Dixit