शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (09:50 IST)

अमेझॉन प्राईम व्हिडीओने आपल्या आगामी ओरिजनल 'मुंबई डायरीज़ 26/11'च्या म्यूझिक अल्बमचे केले अनावरण!

अमेझॉन प्राईम व्हिडीओने आज आपल्या आगामी ओरिजनल 'मुंबई डायरीज़ 26/11'च्या म्यूझिक अल्बमचे अनावरण केले. यामध्ये खाली दिलेले दहा भावपूर्ण साउंडट्रॅक सामील आहेत: 
 
• ये हालात
• तू दफन भी
• पार होगा तू
• मुंबई डायरीज टाइटल थीम
• अनन्या का थीम- इनर स्ट्रेंथ
• द डिपार्टेड
• द ऑफ्टरममैथ
• फ्लैशिंग बैक
• दिया थीम- ऑन थिन आइस
• प्रोफेट्स ऑफ डूम 
 
ट्रॅक लोकप्रिय संगीतकार आणि निर्माता- आशुतोष फाटक यांच्याद्वारे तयार करण्यात आले आहेत. ये हालात, तू दफ़न भी आणि पार होगा तू या गाण्याचे बोल नीरज अय्यंगार यांनी लिहिले असून जुबिन नौटियाल आणि जारा खान (ये हालात), नसीरुद्दीन शाह आणि अल्तमश फरीदी (तू दफ़न भी) आणि आनंद भास्कर (पार होगा तू) यांनी याला आवाज दिला आहे. हे शक्तिशाली ट्रॅक, जे शोच्या थीमसोबत ताळमेळ साधतात आणि प्रभावशाली संदेश देत  संगीतप्रेमींच्या मनात एक खास जागा बनवण्यास सज्ज आहेत. 9 सप्टेंबरला अमेझॉन प्राईम व्हिडीओवर होणाऱ्या वैश्विक प्रीमियर आधी हे ट्रॅक खास संगीतप्रेमींसाठी सादर करण्यात येत आहेत. 
 
निखिल अडवाणीद्वारे रचित, एमी एंटरनेटमेंटच्या मोनिशा अडवाणी आणि मधू भोजवानी निर्मित आणि निखिल अडवाणी आणि निखिल गोन्सालविस सहदिग्दर्शित ‘मुंबई डायरीज 26/11’ ही मालिका, डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल आणि रूग्णालय कर्मचारी ज्यांनी २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या दहशतावादी हल्ल्यादरम्यान लोकांचे जीव वाचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्यांची अप्रकाशित कथा सादर करते. या मालिकेमध्ये ज्यात कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टिना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलावडी सारखे अनेक प्रतिभावान गुणी कलाकार आहेत.
 
'मुंबई डायरीज़ 26/11'चा वैश्विक प्रीमियर 9 सप्टेंबर, 2021 ला विशेष रूपाने अमेझॉन प्राईम व्हिडीओवर होणार आहे.